महात्मा गांधी भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi

Mahatma Gandhi Speech in Marathi – Speech On Mahatma Gandhi in Marathi महात्मा गांधी जयंती भाषण मराठी आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महोदय, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सूत्रसंचालक, उपस्थित मान्यवर तसेच, आयोजक वर्ग या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. कारण, त्यांच्यामुळे मला आज याठिकाणी महात्मा गांधीजीं विषयी बोलण्याची संधी मिळतेय. खरंतर मित्रांनो, आपल्या भारतमातेचे थोर सुपूत्र, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच, संपूर्ण विश्वाला अहिंसेचा महान संदेश देणारे, आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे वंदनीय युगपुरूष होते.

देशाच्या स्वातंत्र्यकालीन इतिहासातील महानक्रांतिकारक, शांतता व अहिंसेचे पुजारक ‘महात्मा गांधी’ यांचा जन्म सन २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरात राज्यामधील पोरबंदर या शहरात झाला होता. महात्मा गांधींचे पूर्ण नाव ‘मोहनदास करमचंद गांधी’ असे होते. परंतु, आपल्या भारतातील लोक प्रेमाने त्यांना बापू असे म्हणत असतं. रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या बापूंना  सर्वप्रथम “महात्मा” ही उपाधी धारण केली होती.

“बापू सन्मान करतो आम्ही, तुमच्या महान नेतृत्वाचा. भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला, हा दाखला आहे तुमच्या कर्तुत्वाचा!”

mahatma gandhi speech in marathi

महात्मा गांधी भाषण मराठी – Mahatma Gandhi Speech in Marathi

Mahatma gandhi bhashan.

तसेच, सन १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना “राष्ट्रपिता” म्हणून पहिल्यांदा संबोधले होते. महात्मा गांधी यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई असे होते. महात्मा गांधी यांचे वडिल करमचंद गांधी हे तत्कालीन काठेवाड प्रांतामधील पोरबंदर या ठिकाणी दिवाण म्हणून काम करीत असतं.

करमचंद गांधी यांची चार लग्न झाली होती, त्यातील पुतळाबाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या. त्याकाळी, आताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उपलब्ध असलेले दवाखाने नव्हते, त्यामुळे करमचंद गांधी यांच्या आधीच्या तीन पत्नींचे प्रसूतीदरम्यानच निधन झाले होते. त्यामुळे, त्यांनी चौथे लग्न महात्मा गांधीजींच्या मातोश्री म्हणजेच पुतळाबाई यांच्यासोबत केले होते.

करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी पुतळाबाई या महात्मा गांधी यांच्या आई होत. पुतळाबाई या खूपच धार्मिक वृत्तीच्या होत्या, त्या सतत उपवास करीत असतं.

पुतळाबाईंनी महात्मा गांधीजींच्या मनावर बालवयात केलेल्या धार्मिक संस्कारांचा प्रभाव आपणा सर्वांना त्यांच्या पुढील जीवनात झालेला दिसून येतो. मोहनदास करमचंद गांधी यांच्या मनावर त्यांच्या मातोश्रींनी त्यांच्या बालपणीच अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता यांसारख्या तत्वांचे बीज रुजवले होते.

शिवाय, प्राणिमात्रांवर दया करणे, त्यांच्यावर करुणा दाखवणे, गरजूंना मदत करणे आणि स्त्रियांचा आदर करणे, यासारखे अनेक संस्कार गांधीजींच्या मनावर त्यांच्या आईकडूनच गिरवण्यात आले होते. महात्मा गांधीजींच्या लहानपणी त्यांच्या आई पुतळाबाई त्यांना जैन संकल्प आणि त्यांच्या प्रथांबद्दल माहिती सांगत असतं.

  • नक्की वाचा: स्वातंत्र्य दिनाचे भाषण

यामुळे, लहानपणापासूनच महात्मा गांधीजींना उपवास करण्याची सवय लागली होती. जैन धर्मातील संकल्पांचा आणि प्रथांचा त्यांच्या मनावर खूप मोठा प्रभाव पडला होता.

मित्रांनो, महात्मा गांधीजी एक गोष्ट स्वत: कबूल करतात की, पौराणिक कथेतील श्रावणबाळ आणि राजा हरीश्चंद्र या दोन कथांतील व्यक्तीमत्वांचा त्यांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडला होता. स्वातंत्र्य पूर्व काळात आपल्या भारत देशामध्ये  बालविवाह करण्याची प्रथा अस्तित्वात होती.

त्या प्रथेनुसार महात्मा गांधी यांचा विवाह इ.स. १८३३ साली वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी असताना, ‘कस्तूरबा माखनजी कपाडिया’ यांच्यासोबत झाला होता. गांधीजी त्यांना प्रेमाने “बा” असे म्हणत. लग्नानंतर महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी या प्रथेप्रमाणे बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच राहिल्या.

यामुळे, महात्मा गांधी यांच्या शालेय शिक्षणात एक वर्षाचा खंड पडला होता. इ.स. १८८५ साली महात्मा गांधीजी फक्त पंधरा वर्षांचे असताना, त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याचवर्षी महात्मा गांधीजींना एक अपत्य देखील झाले होते. परंतु, ते जास्त काळ जगू शकले नाही.

यानंतर महात्मा गांधी यांना चार मुले झाली. ती पुढीलप्रमाणे; इ.स. १८८८ साली हरीलाल, इ.स. १८९२ साली मणिलाल, इ.स. १८९७ साली रामदास आणि इ.स. १९०० साली देवदास. महात्मा गांधी यांची लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती. परंतु, त्यांच्या वडिलांची त्यांना सरकारी नोकरीत दाखल करण्याची इच्छा होती.

त्यामुळे, इसवी सन १९८८ साली आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महात्मा गांधीजी उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला गेले. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी ‘इनर टेंपल’ या गावी राहून, भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा भरपूर अभ्यास केला. अशा प्रकारे, महात्मा गांधीजींनी लंडनच्या  विद्यापीठामधून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.

वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, महात्मा गांधीजी इंग्लंडमध्ये गेले होते, तिथे त्यांना इंग्लंड देशाचे सर्व रीतीरिवाज समजून घेण्यात काही वेळ लागला.

खरंतर मित्रांनो, इंग्लंडमध्ये सर्व पदार्थ मांसाहारी मिळत असल्याने, महात्मा गांधीजींना शाकाहारी पदार्थ जेवायला मिळेपर्यंत उपाशी राहावं लागतं असे. महात्मा गांधीजी हे आपल्या आईला दिलेल्या वचनाशी कटीबद्ध असल्याने, त्यांनी त्या ठिकाणी मांसाहार, मद्यपान करणे वर्ज्य केले. त्याठिकाणी त्यांनी शाकाहारी माणसे शोधली आणि त्यांची एक संघटना स्थापन केली.

अशा पद्धतीने, महात्मा गांधीजी स्वतः त्या संघटनेचे अध्यक्ष बनले. महात्मा गांधीजी लंडनमध्ये ज्या शाकाहारी लोकांना भेटले होते, त्यातील काही लोक हे ‘थीयोसोफिकल सोसायटी’ चे सदस्य देखील होते.

महात्मा गांधीजींनी  त्याठिकाणी राहून तेथील चालीरीती शिकण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, बापू बॅरिस्टर बनून सन १८९१ साली आपल्या भारत देशात परत आले आणि भारतात  आल्यानंतर ते वकिली करू लागले.

  • नक्की वाचा: शिक्षक दिनाचे भाषण

ज्यावेळी त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली होती, त्यावेळी त्यांना न्यायादिशासमोर एखादा मुद्दा मांडणे म्हणजे खूप कठीण वाटत होते. मित्रहो, सुरुवातीला त्यांना वकिलाचे हे काम अजिबात जमत नव्हते. बापू आपल्या लाजाळू वृत्तीच्या स्वभावामुळे कोर्टात कुणाशीही फार बोलत देखील नसत.

सन १८९३ साली वयाच्या २४ व्या वर्षी महात्मा गांधी हे भारतीय व्यावसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले होते. मित्रांनो, त्याकाळी दक्षिण आफ्रिका ही एक इंग्रजांची वसाहत होती. त्याठिकाणी कार्य करण्यासाठी महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्याची २१ वर्षे घालविली.

दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना आपल्या प्रिय महात्मा  गांधीजींनी आपले राजकीय दृष्टीकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व अशा त्यांनी स्वतःतील अनेक कौशल्यांचे बारकाईने धडे गिरविले. महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत असताना, समाजात अस्तित्वात असलेल्या विकलांगपणाची जाणीव झाली.

भारतीय संस्कृती आणि धर्म यामध्ये असणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्येपासून आपण भरपूर दूर आहोत याची जाणीव त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये झाल्यानंतर, त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये राहून भारतीय लोकांचे प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेत उद्योग, व्यवसाय आणि इतर कामधंद्यासाठी त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या भारतीय लोकांचे प्रश्न समजावून घेवून त्यांचे निराकरण करण्याचा गांधीजींनी आपला प्रयत्न सुरू केला.

खरंतर मित्रहो, आपल्या बापूंची अशी धारणा होती की; अशा पद्धतीने जर आपण भारतवासियांचे प्रश्न समजावून घेतले, तरच आपण खऱ्या दृष्टीने भारत देशाला समजून घेऊ. पण, याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींना गंभीरपणे वांशिक वर्ण भेदाचा सामना देखील करावा लागला.

त्याठिकाणी भारतीय लोकांना देण्यात येणारी अपमान जनक वागणूक त्यांनी स्वतः अनुभवली. एके दिवशी महात्मा गांधीजी रेल्वेचा प्रवास करीत असताना, त्यांच्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट असताना सुद्धा त्यांना ‘पीटर मारित्झबर्ग’ येथील रेल्वे स्थानकावर एका रेल्वे अधिकाऱ्याने खाली उतरवले आणि महात्मा गांधीजींना तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले होते.

यावेळी, महात्मा गांधीजींनी तिसऱ्या वर्गाच्या रेल्वेच्या डब्यात स्वतः बसण्यास त्या अधिकाऱ्याला  नकार दिला. तेंव्हा, त्या अधिकाऱ्याने गांधीजींना गाडी बाहेर ढकलून दिले आणि जोरदार ढकल्याने गांधीजी रेल्वेच्या खाली पडले. मित्रांनो, त्यादिवशी आपल्या बापूंनी संपूर्ण रात्र फलाटावर काढली होती.

  • नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराज भाषण 

बापूंच्या मनात आलं असत तर ते त्या इंग्रज अधिकाऱ्याला धडा शिकवू शकले असते. परंतु, सुडाच्या भावनेतून कोणाला शिक्षा करणे असा त्यांचा कधीच हेतू नव्हता. आपले महात्मा गांधीजी हे अहिंसावादी असल्याने,  केवळ अन्यायकारक व्यवस्था बदलणे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीजींना अशा अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

शिवाय, त्यांना त्याठिकाणी असणाऱ्या समाजातील अनेक मुळ समस्येंचा देखील अनुभव आला होता. उदाहरणार्थ, प्रवाशांना वाट काढून न दिल्यामुळे, महात्मा गांधीजी यांना मार देण्यात आला होता.

गांधीजी हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना, त्यांना हॉटेलमधून देखील बाहेर काढून देण्यात आलं होत. याशिवाय, महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतील ‘डर्बन’ या शहरात वकिली करीत असताना, त्यांना तेथील न्यायाधीशांनी डोक्यावरील टोपी काढून ठेवण्याचा आदेश दिला होता. परंतु, आपल्या बापूंनी यावेळी सुध्दा न्यायाधीशाचा आदेश अमान्य केला.

अश्या प्रकारचे अनेक अनुभव आपल्या पाठीशी घेतल्यानंतर, महात्मा गांधीजींनी एक सामाजिक नागरिक म्हणून ब्रिटीश राज्यातील आपल्या लोकांच्या समस्यांविषयी प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. भारतीय लोकांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि आपलं स्वतःचं सामाजिक स्थान निर्माण करण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला.

गांधीजींच्या मनात असे विचार चालू असताना, सन १९०६ साली मात्र ब्रिटीश सरकारने दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू केला.

त्यावेळी बापूंनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आपलं तेथील मुक्काम वाढवलं आणि भारतीय नागरिकांना राजकीय व सामाजिक हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देखील दिली. त्याचबरोबर, गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेच्या ब्रिटीश सरकारकडे भारतीय लोकांच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला.

मित्रांनो यावेळेस, आपल्या बापूंनी आपल्या अहिंसेच्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला होता. सन १८९४ साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वेगवेगळ्या समाजात विखुरलेल्या भारतीय नागरिकांना एकत्रित करून ‘नाताळ भारतीय कॉन्ग्रेस‘ नावाचा एक राजकीय पक्ष देखील स्थापन केला.

यानंतर, सन ९ जानेवारी १९१५ साली काँग्रेसचे उदारमतवादी नेता “ गोपाळ कृष्ण गोखले ” यांच्या सल्ल्याने महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून आपल्या मायदेशी परत आले. खरंतर मित्रहो, महात्मा गांधीजी “गोपाळ कृष्ण गोखले” यांना आपले राजकीय गुरु मानत असतं.

ज्यावेळी महात्मा गांधीजी भारतात परत आले होते, त्यावेळी त्यांनी स्वतःची राष्ट्रवादी नेता, तसेच संयोजक आणि संघटक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर  ख्याती मिळवली होती. आपल्या राजकीय कार्याला सुरुवात करण्याच्या प्रारंभी महात्मा गांधीजी  यांच्या मनावर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संयम, संतुलन आणि कोणत्याही व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करणे, यासारख्या विचारांचा प्रभाव पडला होता.

मित्रहो, गोपाळ कृष्ण गोखले हे त्यावेळेला “भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे” अध्यक्ष होते. भारत देशात परत आल्यानंतर महात्मा गांधीजी देशाच्या विविध भागात जावून तेथील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. शिवाय, आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचे दु:ख आणि दारिद्र्य पाहून महात्मा गांधीजी हे स्वतः देखील दु:खी झाले होते.

अहमदाबाद जवळील साबरमती नदीच्या काठी असलेल्या एका आश्रमात महात्मा गांधीजी  वास्तव्य करू लागले.

“साबरमतीचे संत तुम्ही महान, सत्य-अहिंसेचे शस्त्र तुम्ही आम्हांला दिले छान. सर्व जगी अहिंसेचे पुजारी म्हणून, ठेवू आम्ही पहिला तुमचा मान!”

भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांनी अहिंसावादी सत्याग्रह करण्याचे एक नवीन अभिनव तंत्र स्वतःच्या अंगी अंगिकारले. महात्मा गांधीजी हे अहिंसेचे पुजारी असल्याने इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी असहकार, अहिंसा आणि शांततामय या तीन तत्वांचा आपल्यामध्ये अवलंब केला होता.

सन १९१९ साली पंजाबमधील जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणामुळे देशातील लोकांच्या मनात इंग्रज सरकारबद्दल क्रोधाचा भडका उडाला होता. त्यामुळे, या घटनेच्या निषेधार्थ भारत देशात जागोजागी मोर्चे निघाले होते आणि ते मोर्चे दडपून काढण्यासाठी इंग्रज सरकारला खूप दमछाक देखील करावी लागली होती.

  • नक्की वाचा: राजमाता जिजाऊ भाषण मराठी

अशावेळी, महात्मा गांधीजी यांनी जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणी इंग्रज सरकारचा निषेध केला. खरंतर मित्रांनो, सहकार चळवळ सुरु करण्यामागे महात्मा गांधीजींचा असा हेतू होता की, भारतातील ब्रिटीशांचे राज्य हे केवळ भारतातील लोकांच्या सहकार्यावर अबलंबून आहे;

त्यामुळे, जर भारतीयांनी त्यांना विरोध केला तरच त्यांचे शासन पूर्णपणे ढासळून जाईल. मित्रहो, अशा हेतूने महात्मा गांधीजींनी जनतेला आपल्या असहकार आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले. असहकार आंदोलन सुरू असताना, सन १९२० साली  लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय सभेचे संपूर्ण नेतृत्व महात्मा गांधीजी यांच्याकडे आले.

अशा प्रकारे, असहकार चळवळीनुसार आपल्या देशातील नागरिकांनी शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा आणि महाविद्यालये यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मित्रहो, असे केल्याने इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देण्याबाबत काही पाऊले उचलतील; असे आपल्या  राष्ट्रीय सभेच्या सदस्यांना वाटत होते.

परंतु, गांधीजींचे हे आंदोलन फार काळ टिकू शकले नाही. सन १९२२ साली उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपुर जिल्हाच्या चौरीचौरा या भागात एका शांततापूर्ण चाललेल्या मिरवणुकीवर पोलीसांनी गोळीबार केला.

पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे असहकार चळवळीत सहभागी असलेल्या नागरिकांना खूप राग आला आणि या रागातच घडलेल्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी तेथील एक पोलीस चौकी जाळून टाकली. या जाळपोळीत एक पोलीस अधिकारी व २२ पोलीस ठार झाले. या घटनेची माहिती जेंव्हा बापूंना समजली, तेंव्हा  त्यांना खुप वाईट वाटलं आणि ते एकदम अस्वस्थ झाले.

गांधीजींना वाटू लागलं की, आपण असहकार आंदोलन सुरु करून लोकांना अहिंसेच्या मार्गावर चालायला लावलं. परंतु, अहिंसेच्या मार्गावर चालणे इतक सोप नाही शिवाय, तसे करणे सर्वांनाच शक्य होणार नाही, म्हणून महात्मा गांधी यांनी आपली असहकार चळवळ मागे घेतली. मित्रहो, याशिवाय सन १९१८ साली गुजरातमधील खेडा या गावात सतत पडलेल्या पावसामुळे संपूर्ण गाव हे दुष्काळग्रस्त झालं होत. तेथील पिकांची अवस्था खूपच वाईट होती.

खेडा या गावात अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा इंग्रज सरकार मात्र भारतीय शेतकऱ्यांकडून सक्तीने शेतसारा वसूल करीत होते. परिणामी, या सगळ्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अजुन खूप बिकट, गुंतागुंतीची आणि वाईट बनली. अशावेळी, महात्मा गांधीजींनी त्याठिकाणी राहत असणाऱ्या लोकांसाठी एक आश्रम उभारला आणि आपल्या लहान मोठ्या सर्व अनुयायांना एकत्रित केलं.

याशिवाय, महात्मा गांधीजींनी गावातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आपल्या विश्वासात घेतले. शेतकऱ्यांना महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांकडे यावेळी शेतसारा न भरण्याचा आदेश दिला, तेंव्हा सन १९१८ साली शेतकऱ्यांनी शेतसारा बंदीची चळवळ सुरु केली आणि महात्मा गांधीजींना या चळवळीचे अध्यक्ष बनवले.

महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांनी येथील  शेतकऱ्यांच्या समस्येसंबंधी इंग्रज सरकारसोबत चर्चा केली.

शेवटी, ब्रिटीश सरकारने त्यांची मागणी मान्य करून, तुरुंगात कैद्य केलेल्या सर्व लोकांची सुटका केली. या चळवळीमुळे महात्मा गांधीजींची प्रसिद्धी संपूर्ण जगभर पसरली होती. याशिवाय, इसवी सन  १९१४ साली झालेल्या पहिल्या महायुद्धानंतर आपल्या भारत देशात खूप महागाई वाढली होती आणि या वाढलेल्या महागाईत अहमदाबाद येथील कामगारांनी वेतनवाढीकरीता गिरणी मालकांकडे विनंती केली.

परंतु, कामगारांची ही मागणी मान्य करण्यात आली नाही. यावेळी, महात्मा गांधीजींनी स्वतः त्याठिकाणी जावून संप पुकारला आणि तिथे ते उपोषणाला बसले. महात्मा गांधीजींसोबत गिरणी कामगार देखील उपोषणाला बसले होते. शेवटी, महात्मा गांधीजींच्या या अहिंसावादी आंदोलनासमोर गिरणी मालकांनी हार पत्करली आणि गिरणी कामगारांना वेतनवाढ दिली.

पण मित्रांनो, अशा या थोर आणि जागृत विचारवंताचा मृत्यू मात्र खूप भयानक पद्धतीने आणि अनपेक्षितपणे झाला.

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजी दिल्ली येथील बिर्ला बागेत आपल्या सहकाऱ्यांसोबत फिरत असताना ‘नथुराम गोडसे’ या व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. महात्मा गांधीजी यांना गोळी लागताच ते जमिनीवर कोसळले. मित्रहो, गांधीजींच्या मृत्यूबद्दल लोकांची अशी धारणा आहे की, महात्मा गांधीजी यांनी मृत्युपूर्वी आपल्या मुखातून ‘हे राम’ असे उद्गार काढले होते.

सन १९४९ साली महात्मा गांधीजींच्या मारेकऱ्याला आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात आले व त्यांच्यावर खटला देखील चालविण्यात आला. भारत सरकारने आपल्या कायद्यानुसार नथुराम गोडसे या खूनीला आणि त्यांच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्याचे ठरवले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि निवारण्यासाठी, जातीभेदेची दरी कमी करण्यासाठी या महामानवाने खरच खूप मोलाची कामगिरी केली होती. म्हणूनच, आपल्या भारत देशात आज सुद्धा भारतीय जनतेच्या मनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याबद्दल भरपूर आदर आहे.

खरंतर, महात्मा गांधीजींनी केलेल्या या उत्कृष्ठ  कामगिरीबद्दल महात्मा गांधीजी हे फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण विश्वात देखील ओळखले जातात. म्हणूनच मित्रांनो, केवळ भारत देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आदर्शवादी असणाऱ्या महात्मा गांधीजींचा जन्मदिन हा सगळीकडे अहिंसादिन म्हणून साजरा केला जातो. अशा या महान राष्ट्रपित्याला माझा कोटी कोटी प्रणाम! जय हिंद! जय भारत!

“ज्यांनी लिहीली, पारतंत्र्य मुक्तीची गाथा. त्या राष्ट्रपित्याच्या, चरणी ठेविते आज माथा!”

– तेजल तानाजी पाटील

बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या mahatma gandhi speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “महात्मा गांधी भाषण मराठी” speech on mahatma gandhi in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mahatma gandhi jayanti speech in marathi   या mahatma gandhi bhashan marathi article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mahatma gandhi marathi bhashan माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण mahatma gandhi bhashan marathi madhe या लेखाचा वापर mahatma gandhi information in marathi speech असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

ham

Sunday , 31 March 2024

मराठीचे तपशील

Gandhi Jayanti: गांधी जयंती विषयावर दमदार भाषण, ऐकून सगळेच वाजवतील टाळ्या

Gandhi jayanti speech in marathi: २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांची १५४वी जयंती साजरी करण्यात येणार आहे..

Mahatma Gandhi

Gandhi Jayanti 2023: देशात दरवर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधींनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे केवळ भारतातच नव्हेतर संपूर्ण जगभरात कोणत्याही व्यक्तीला महात्मा गांधींची ओळख पटवून देण्याची गरज नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वाढदिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महात्मा गांधी यांचा वाढदिवस 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' म्हणून देखील साजरा केला जातो.

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त बहुतेक ठिकाणी भाषणे आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शाळेत किंवा महाविद्यालयात विद्यार्थी महात्मा गांधी या विषयावर भाषण करतात. महात्मा गांधीच्या १५४ व्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना खालील दमदार भाषण पाठ करून सगळ्यांवर आपली छाप सोडता येईल.

Sonia Gandhi Health: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती अस्वास्थामुळे केले भरती

आदरणीय शिक्षक, मुख्यधापक आणि माझ्या मित्रांनो....

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत. महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. अहिंसक पद्धतींने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

गांधीजींनी त्यांचे शिक्षण ब्रिटीशशासित भारतात पूर्ण केले. यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. दक्षिण आफ्रिकेत कायद्याचा अभ्यास केल्यानंतर ते १९१५ मध्ये भारतात परतले आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग बनले. उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे बळ वाढवले. त्यांनी चंपारण सत्याग्रह, असहकार आंदोलन, दांडी मार्च आणि भारत छोडो आंदोलन यांसारख्या महत्त्वाच्या चळवळींचे नेतृत्व केले. ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढताना महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबूनही ध्येय गाठता येते हे सिद्ध केले.

गांधीजींचा मद्यपानाला विरोध दर्शवला. धर्म आणि जातीच्या आधारावर समाजात कोणाशीही भेदभाव केला जाऊ नये, सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे, महिलांचा आदर केला पाहिजे, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, असा गांधीजींचा हेतू होता. गांधीजींनी भारतीय समाजात प्रचलित असलेल्या अस्पृश्यतेसारख्या वाईट गोष्टींविरुद्ध सातत्याने आवाज उठवला. हरिजनांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले बहुमोल योगदान दिले. हरिजनांना समाजात समान दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

गांधी जयंतीनिमित्त बापूंच्या स्मरणार्थ देशभर कार्यक्रम आयोजित केले जात असले तरी मुख्य कार्यक्रम दिल्लीतील राजघाटावर होतो. राजघाट हे गांधीजींचे समाधी स्थळ आहे. गांधी जयंतीला देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर नेते राजघाटावर येऊन गांधीजींना पुष्पांजली वाहतात.

मित्रांनो, महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्यासाठीच संघर्ष केला नाही तर भारताला आत्मनिर्भर होण्याचा मार्गही दाखवला. त्यांचे विचार आजही समर्पक आहेत आणि भविष्यातही राहतील.भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी व्हायला हवे. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेऊन आपण भारताच्या स्वच्छता मोहिमेला बळ देऊ शकतो. स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे. सगळ्यांनी घर, परिसर, बाजारपेठ, रेल्वे स्थानक, पर्यटन स्थळे यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी व्हायला हवे. आपला परिसर स्वच्छ ठेवून आपण ते यशस्वी करू शकतो. स्वच्छतेसाठी श्रमदान ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. 1 ऑक्टोबर रोजी सरकारने मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी 'एक तारीख, एक तास, एक एकत्र' मोहीम सुरू केली. पण स्वच्छतेचा समावेश आपण सवयीप्रमाणे करायला हवा. स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे. ही मोहीम केवळ एक-दोन दिवसांची नसून ती सतत जीवनाचा भाग बनवली पाहिजे. घर, परिसर, बाजारपेठ, रेल्वे स्थानक, पर्यटन स्थळे यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आता मला माझे भाषण संपवायचे आहे. मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!!!

WhatsApp channel

MarathiGyaan - Essay, Speech, Stories and More

महात्मा गांधी मराठी भाषण | Mahatma Gandhi Speech in Marathi | MarathiGyaan

महात्मा गांधी मराठी भाषण - mahatma gandhi speech in marathi.

आज मी तुमच्या करीत लिहले आहे महात्मा गांधी मराठी भाषण (mahatma gandhi speech in marathi) . आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल.हे गांधी जयंती (gandhi jayanti speech in marathi) साठी सर्वोत्तम भाषण आहे.

mahatma gandhi speech in marathi

महात्मा गांधी मराठी भाषण

“ बेष्णव जन तो तेणे कहिए जो पीरपराई जाणेरे..."

महात्माजींच्या बाबतीत हे अगदी शंभर टक्के खरे आहे. म्हणून प्रथमच महात्माजींना; आपल्या * राष्ट्रपित्याला ' त्यांच्या जयंती निमित्त मी शतप्रणाम करुन... त्यांना आदरांजली वाहतो.

इथे उपस्थित माझ्या गुरुजनांना देखील माझे सादर वंदन. माझ्या दोस्तांनो, .

आपल्या हातून रोज नव्या-नव्या चुका होतच असतात. त्यासाठी आपले आई-बाबा, शाळेत शिक्षक आपल्याला वेळीच समज देतात. कधी कधी ( नव्हे बरेचदा ! ) आपल्याला त्यांचा रागही येतो. पण आपण तर सामान्य मुले आहोत. आपण त्यांचे ऐकलेच पाहिजे. कसे ? त्यासाठी महात्माजींच्या बालपणातील दोन घटना सांगतोय. त्यावेळी ते होते एक सामान्य विद्यार्थी, ' मोहनदास करमचंद गांधी. '

शाळेत जाणाऱ्या मोहनदासला शाळेत वाईट मित्रांची संगत लागली. अवघ्या सहाव्या वर्षी खोटे बोलणे, चोरी करणे, विडी ओढणे या वाईट गोष्टी. त्याच्या हातून घडल्या. वडिलांच्या हे लक्षात येताच त्यांनी मोहनला हटकले... खडसावले ! मोहनलाही आपली चूक ध्यानात आली. त्याने बडिलांजवळ झाल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली. पुन्हा असे न करण्याचा “ खरे बोलण्याचा ' निश्चय केला. आणि अभ्यासात स्वत:ला गाढून घेतले.

मग इतके की स्वत:ला लिहिता न येणारा इंग्रजी शब्द ' शेजारच्या मित्राच्या वहीत बघून लिही. ' असे शिक्षकांनी सांगून सुद्धा त्या शब्दाची कॉपी केली नाही: चुकीचे लिहिले. नंतर तो शब्द. त्याचे स्पेलिंग प्रयत्नपूर्वक पाठ करुन मगच आपल्या वहीत उतरवले. ही घटना आहे राजकोट येथील शाळेत ते शिकत असतानाची... आणि ते स्पेलिंग होते ' केटल ' या शब्दाचे. याच निश्चयी व निग्रही स्वभावामुळेच केवळ “ सत्य ' ब ' अहिंसा, या दोन तत्त्वांच्या जोरावर गांधींजींनी अन्यायाविरुद्ध लढा दिला व जुलमी इंग्रज सत्तेला प्रतिकार केला.

वास्तविक पाहता गांधीजींचा जन्म गुजरातमधील * पोरबंदर ' या गावात झाला. वडिल पोरबंदरच्या महाराजांचे दिवाण होते. सारे काही व्यवस्थित होते. मॅट्रिक नंतर पुढील शिक्षणासाठी ते परदेशात गेले. नि बॅरिस्टर होऊनच भारतात परतले. हायकोर्टात ( मुंबईच्या ) वकिली करु लागले. एका. खटल्याच्या निमित्ताने त्यांना दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. आणि ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. दक्षिण आफ्रिकेत भारतीय लोकांवर होणारे अत्याचार, अन्याय त्यांना पाहवले नाहीत. तिथेच त्यांनी यासाठी तेथील भारतीयांना एकत्र केले. त्यांना त्यांच्यावर होत न असलेल्या अन्यायाची जाणीव करुन दिली. त्यासाठी सत्याग्रह पुकारला आणि भारतीयांना देय असलेले न्याय्य हक्क व सवलती मिळवून देऊन मगच भारतात परतले.

भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही हे त्यांच्या लक्षात आले. ब्रिटिश सत्ता भारतातल्या भारतीयांच्या हक्कांवर, स्वातंत्र्यावर गदा आणत . होती. आपले भारतीय जात-पात, स्पृश्य-अस्पृश्य च्या विळख्यात अडकले होते. प्रथम सर्व भारतीयांना मनाने एकत्र आणण्यासाठी हे जाती भेद मिटविण्यासाठी गांधींजींनी प्रयत्न सुरु केले. अस्पृश्यांना ते हरिजन म्हणूनसंबोधत. त्यांना न्याय हक्क, योग्य सामाजिक दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.

सर्व जनता एक करण्यासाठी गांधीजी पदयात्रा काढत. त्यात त्यांच्या पत्नी कस्तुरबाही असत. या दरम्यान गांधीजींच्या लक्षात आली ती भारतातील ठराविक स्तरावरील दारिक्र्यावस्था ! घालायला कपडे नाहीत म्हणून न येणारे उपाशी असलेले 'हे पीडित पाहून; या महात्म्याने प्रतिज्ञा केली “ जोवर देशातील प्रत्येकाला स्वतःच्या अगावर घालायला कपडा नसेल तो वर मी ही केवळ पंचा नेसेन '...' जोवर प्रत्येकाला दोन वेळची रोजी-रोटी मिळणार नाही तोवर मी देखील एकवेळ ( दिवसातून ) उपासच करेन. ' मग त्यांनी या वस्त्यांतून चरखे वाटले. स्वत: सूत कातून त्याचे वस्त्र गुंडाळण्याचा स्वावलंबनाचा आदर्श या लोकांपुढे... आपल्यापुढे ठेवला आणि याच घटनेने ते राष्ट्राचे कैवारी " राष्ट्रपिता ' बनले.

साबरमती नदीकाठी आश्रम बांधून गांधीजी साधेपणाने राहू लागले. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी ' यंग इंडिया ' हे साप्ताहिक चालवीत होते. सत्य, अहिंसा आणि असहकार याच्या बळावरच स्वातंत्र्य मिळावे याचा आग्रह त्यांनी धरला होता.

भारतीय स्वातंत्र्याचा लढा दिवसेंदिवस ऊग्र बनत चालला होता. इंग्रज सरकार आता या लढ्याने त्रासले होते. हेराण झाले होते. याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोलमेज परिषद इंग्लंड येथे भरविण्यात आली होती. गांधीजी त्या परिषदेस हजर होते. तेथेही कणखर आणि स्पष्टपणे त्यांनी भारताची बाजू मांडली. भारतात परत आल्यावर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबईला ब्रिटीश सरकारला “चले जाव “ चा आदेश गांधीजींनी दिला. आणि स्वातंत्र्यलढ्याने आपला अंतिम टप्पा गाठला. यश स्वातंत्र्य आता समोर दिसत होते. स्वातंत्र्य सूर्याची लख्ख किरणे आता भारतावर पडणार होते पण भारतातील हिंदू मुसलमानांचे तंटे काही केल्या मिटत नव्हते. गांधींजींनी हे तंटे मिटविण्यासाठी जिवाचे रान केले पण व्यर्थ.

ब्रिटिशांनी याच संधीचा फायदा घेतला. भारताला स्वातंत्र्य बहाल केले पण त्याची हिंदुस्थान - पाकिस्तान अशी फाळणी करुन. या फाळणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हिंदु-मुसलमान सर्वांवरच अत्याचार झाले. सर्वांचेच खूप नुकसान झाले. गांधींजींचे स्वप्न होते... एकसंघ भारताचे... ते तुटले... गांधीजी व्यथित झाले. .. दुःखी झाले... नोखाली येथे त्यांनी एक शांतियात्रा देखील काढली. मनामनांतील दुवे साधणारा तो एक अखेरचा प्रयत्न होता. स्वातंत्र्यलढ्यात समर्पित जीवन जगणाऱ्या या सेनापतीने शेवट पर्यंत आपली तत्वे सोडली नाहीत. “ सत्याचे प्रयोग ' नावाचे आत्मकथन पुढील पिढीसाठी दिशादर्शक म्हणून त्यांनी लिहून ठेवले.

अशा-या महात्म्याला एका तरुणाने ३० जानेवारी १९४८ रोजीं सायंप्रार्थथेला जातेवेळी छातीवर गोळ्या घालून संपविले. जातेवेळी शांतपणे महात्म्याच्या तोंडून शब्द उमटले, हे राम! .

धन्यवाद!

तुम्हाला महात्मा गांधी मराठी भाषण (mahatma gandhi marathi bhashan) कस वाटलं हे कंमेंट करा. आणि आपल्या मित्रां सोबत share करा.

लोकमान्य टिळक मराठी भाषण

सावित्रीबाई फुले मराठी भाषण

१५ ऑगस्ट मराठी भाषण

बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण

You might like

Post a comment, contact form.

  • Photogallery
  • Marathi News
  • career news
  • Gandhi Jayanti Speech Write An Essay On Gandhi Jayanti With The Help Of These 5 Points Everyone Will Appreciate It

Gandhi Jayanti Speech: या ५ मुद्यांच्या मदतीने गांधी जयंतीवर निबंध लिहा; सगळेच करतील कौतुक

Gandhi jayanti speech in marathi: दरवर्षी २ ऑक्टोबरला देशभरात गांधी जयंती साजरी केली जाते. कारण याच दिवशी राष्ट्रपिता म्हणून प्रसिद्ध असलेल्या महात्मा गांधींचा जन्म झाला होता. यानिमित्ताने शाळांमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. अशाच कार्यक्रमात हटके भाषण करून तुम्हीही लोकांची मने जिंकू शकता..

Gandhi Jayanti Speech

गांधी जयंतीनिमित्त तुमच्या निबंधात किंवा भाषणात हे ५ मुद्दे नक्की समाविष्ट करा…

  • २ ऑक्टोबर २०२३ हा महात्मा गांधींजींची १५४ वी जयंती आहे. भारतात दरवर्षी २ ऑक्टोबर या दिवस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करतात.
  • संयुक्त राष्ट्रसंघाने २ ऑक्टोबर हा 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून घोषित केला आहे. गांधीजींचे आवडते भजन, रघुपती राघव राजा राम हे देखील २ ऑक्टोबर रोजी वाजवले जाते.
  • या दिवशी, महात्मा गांधींचा पुतळा, रस्ते आणि बापूंच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाची ठिकाणे (साबरमती आश्रम, त्यांच्या अंत्यसंस्काराचे ठिकाण आणि बरेच काही) सजवले जाते.
  • ईस्ट इंडिया कंपनीचे शासन संपवण्यात बापूंच्या योगदानाची आठवण म्हणून हा दिवस देशभर साजरा केला जातो. स्वावलंबन, धैर्य, अहिंसा, साधेपणाचे धडे त्यांनी जगाला दिले.
  • महात्मा गांधी म्हणाले, "उद्या मरणार असल्यासारखे जगा." असे शिका की तुम्ही सदैव जगाल”, म्हणून या गांधी जयंतीच्या दिवशी आपण सर्वांनी असे लोक बनू या, जेणेकरून त्यांचे स्वप्न साकार होईल.

असा लिहिला महात्मा गांधींवर निबंध…

अजय जयश्री

महत्वाचे लेख

Bombay College Of Pharmacy Recruitment 2023: ‘बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई’ येथे विविध पदांची भरती! आजच करा अर्ज..

News18 Logo

  • LIVE TV थेट टीव्ही NEWS18 इंडिया LIVE TV
  • News18 APP DOWNLOAD
  • Latest बातम्या
  • वेब स्टोरीज
  • Cha-Sambhaji-Nagar
  • अ‍ॅस्ट्रोलॉजी

तुमचे शहर निवडा

  • छ. संभाजीनगर

Mahatma Gandhi: यंदा महात्मा गांधी जयंतीनिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

महात्मा गांधी जयंतीनिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण

महात्मा गांधी जयंतीनिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण

Mahatma Gandhi speech in Marathi: महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधींची जयंती साजरी केली जाते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated : September 29, 2022, 6:03 am IST
  • Follow us on

संबंधित बातम्या

  मुंबई 28, सप्टेंबर: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी कित्येक लोकांनी आपलं आयुष्य वेचलं. कित्येक लोकांनी बलिदान दिलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोंबर रोजी जयंती आहे. दरवर्षीप्रमाणे तुम्हाला एका गोष्टीची तयारी करावी लागणार आहे. तुमच्या घरातील लहान मुलाला भाषण लिहून देण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. दरवर्षी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त शालेय मुलांना भाषण करण्यास सांगितलं जातं. मग तुम्हालाच त्यांच्या भाषणाची तयारी करून घ्यावी लागते. तुम्ही त्यांची भाषणाची तयारी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हवी. लहान मुलांकडून भाषणाची तयारी (Mahatma Gandhi birth Anniversary speech for children) करून घेताना पुढील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात..

  • दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधींची जयंती साजरी केली जाते.
  • महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.
  • त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.
  • महात्मा गांधींना बापू म्हणूनही ओळखले जाते.
  • ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यात महात्मा गांधींचे विशेष योगदान आहे.

हेही वाचा:   वाढदिवसानिमित्त तुमच्या मित्रमैत्रिंणींना द्या खास शुभेच्छा, Whatsappला ठेवा हे सुंदर स्टेटस

  • देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यात बापूंनी महत्त्वाची भूमिका बजावली.
  • लंडनमधून बॅरिस्टरची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या नावासाठी समर्पित केले.
  •  विरोध करण्यासाठी त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. आपल्या आयुष्यात त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध अनेक आंदोलने केली.
  • चंपारण्य सत्याग्रह, असहकार आंदोलन, दांडी सत्याग्रह, दलित चळवळ, भारत छोडो आंदोलन या त्यांच्या काही प्रमुख चळवळी आहेत.
  •  ब्रिटिश साम्राज्याचा पाया कमकुवत करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली.
  •  सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वाच्या जोरावर त्यांनी इंग्रजांना अनेक वेळा गुडघे टेकण्यास भाग पाडले.
  • हिंसेचा मार्ग अवलंबून तुमचे हक्क कधीच मिळू शकत नाहीत, असे गांधीजींचे मत होते.
  • यंदा महात्मा गांधींची १५२वी जयंती साजरी होणार आहे.
  • आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
  • बापूंचे सत्य आणि अहिंसेचे विचार भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शन करत आले आहेत.
  • लोकांच्या हक्कासाठी ते आयुष्यभर झटले. समाजातील भेदभावाबद्दल त्यांनी सतत आवाज उठवला.
  • First Published : September 29, 2022, 6:03 am IST

एक ऑगस्टपासून होणारे कोणते बदल करणार 'खिशा'वर परिणाम?

एक ऑगस्टपासून होणारे कोणते बदल करणार 'खिशा'वर परिणाम?

Weird : भारतातील असं ठिकाण जिथं माणसांप्रमाणे प्राण्यांनाही असते रविवारची सुट्टी

Weird : भारतातील असं ठिकाण जिथं माणसांप्रमाणे प्राण्यांनाही असते रविवारची सुट्टी

ते थायलंडवरून आले, सोबत आणले 100 वेगवेगळे जीव, कस्टमचे अधिकारी बुचकळ्यात पडले

ते थायलंडवरून आले, सोबत आणले 100 वेगवेगळे जीव, कस्टमचे अधिकारी बुचकळ्यात पडले

महत्वाच्या बातम्या.

पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात पोहायला गेले ते परतलेच नाही; भिवंडीत खळबळ

पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात पोहायला गेले ते परतलेच नाही; भिवंडीत खळबळ

'दुसरीकडे असेल की मळ, तुमच्याकडे आला की...', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

'दुसरीकडे असेल की मळ, तुमच्याकडे आला की...', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

पाकिस्तानी महिला सीमा हैदरला का मिळत नाही क्लीन चिट? हे आहे महत्त्वाचं कारण

पाकिस्तानी महिला सीमा हैदरला का मिळत नाही क्लीन चिट? हे आहे महत्त्वाचं कारण

राजासारखे जीवन जगण्यासाठी व्यक्तीने केली 4 लग्न, बांधला 14 मजली महाल

राजासारखे जीवन जगण्यासाठी व्यक्तीने केली 4 लग्न, बांधला 14 मजली महाल

'दारू पिणं ही माझी सर्वात मोठी चूक' रजनीकांतचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले...

'दारू पिणं ही माझी सर्वात मोठी चूक' रजनीकांतचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले...

  • Times Now Marathi
  • TN Navbharat
  • ET Now Swadesh

ट्रेंडिंग :

marathi news

Mahatma Gandhi Jayanti 2023 Speech In Marathi : महात्मा गांधी जयंतीला असं करा प्रभावी भाषण

Updated Sep 27, 2023, 08:17 PM IST

Mahatma Gandhi

Mahatma Gandhi

महात्मा गांधी जयंती भाषण नमुना 1

महात्मा गांधी जयंती भाषण नमुना 2, महात्मा गांधी जयंती भाषण नमुना 3, महात्मा गांधी जयंती भाषण नमुना 4.

Lok Sabha Election 2024 वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर यादीत 11 उमेदवारांचा समावेश

Lok Sabha Election 2024: वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, यादीत 11 उमेदवारांचा समावेश

Viral Video खतरनाक सापाशी तो करत होता मस्ती युजर्स म्हणाले

Viral Video: खतरनाक सापाशी तो करत होता मस्ती, युजर्स म्हणाले...

Kolhapur रोहित शर्मा आऊट झाल्याने CSK चाहत्याचा जल्लोष संतापलेल्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्याने केली मारहाण उपचारादरम्यान मृत्यू

Kolhapur: रोहित शर्मा आऊट झाल्याने CSK चाहत्याचा जल्लोष, संतापलेल्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्याने केली मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

Daily Horoscope 1 April आजचे राशीभविष्य 1 एप्रिल कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस वाचा सविस्तर

Daily Horoscope 1 April: आजचे राशीभविष्य, 1 एप्रिल, कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस? वाचा सविस्तर

आरबीआयचा रेपो रेट ठरवणार Share Market ची वाटचाल या तारखेवर ठेवा Watch

आरबीआयचा रेपो रेट ठरवणार Share Market ची वाटचाल, या तारखेवर ठेवा Watch

Fake News Complaint Number फेक न्यूजची माहिती देण्यासाठी नंबर जाहीर या नंबरवर करा Whatsapp

Fake News Complaint Number: 'फेक न्यूज'ची माहिती देण्यासाठी नंबर जाहीर, 'या' नंबरवर करा Whatsapp

Upcoming IPO In April नव्या आर्थिक वर्षात गुंतवणूक करण्याची संधी! एप्रिलमध्ये या कंपन्यांचे IPO होणार लॉन्च वाचा सविस्तर

Upcoming IPO In April: नव्या आर्थिक वर्षात गुंतवणूक करण्याची संधी! एप्रिलमध्ये या कंपन्यांचे IPO होणार लॉन्च, वाचा सविस्तर

Dr Manisha Kayande  विरोधकांची विधाने निरर्थक राज्यघटना बदलण्याच्या आरोपावर डॉ मनिषा कायंदे यांची टीका

Dr Manisha Kayande : विरोधकांची विधाने निरर्थक, राज्यघटना बदलण्याच्या आरोपावर डॉ. मनिषा कायंदे यांची टीका

अवकाशात फिरणाऱ्या उपग्रहांचा वेग किती असतो

अवकाशात फिरणाऱ्या उपग्रहांचा वेग किती असतो?

Lok Sabha Election 2024 वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर यादीत 11 उमेदवारांचा समावेश

भारतात विकल्या जाणाऱ्या सर्वात शक्तिशाली Bikes, पाहा लिस्ट

Viral Video खतरनाक सापाशी तो करत होता मस्ती युजर्स म्हणाले

मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती

गांधी, महात्मा

गांधी, महात्मा : (२ ऑक्टोबर १८६९–३० जानेवारी १९४८). मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधी हे वैष्णव वाणी. गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळाली होती. गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते. आई पुतळीबाई व वडील हे दोघेही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते. ते नियमाने धार्मिक ग्रंथांचे पठन करीत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचरणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवीत. त्या वेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत ते पाहण्यात आणि ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र यांच्या कथा ऐकण्यात मोहनदास बाळपणी सातआठ वर्षांचे असताना रंगून जात. हरिश्चंद्राच्या अद्‍भुतरम्य कथेचे त्यांना वेडच लागले होते. हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले. अहिंसात्मक सत्याग्रहाला आवश्यक निष्ठेची मनोभूमिका लहानपणीच तयार झाली.

कस्तुरबा आणि मोहनदास यांचे वय सारखेच होते. या दोघांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. ही विद्यार्थी दशा होती. घरचे वातावरण शीलसंपन्नाचे असले, तरी बाहेरचे सवंगडी आणि मित्र निरनिराळ्या कौटुंबिक परिस्थितीत होते. त्यांनी मांसाहार, धुम्रपान, वेश्यागमन इ. गोष्टींचे प्रलोभन मोहनदासांना दाखविण्याचा प्रयत्‍न केला. ते त्यात काही काळ फसलेही. परंतु तीव्र पश्चात्ताप होऊन ते त्यातून लवकरच बाहेर पडले. १८८७ साली ते मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.

१८८५ मध्येच करमचंद यांचे निधन झाले. बेचरजी स्वामी यांनी पुतळीबाईंना सांगितले, की मोहनदासाला उच्च वैद्यकीय शिक्षणाकरिता इंग्‍लंडलापाठवावे. परंतु वैद्याला मृत शरीराला स्पर्श करावा लागतो हे बरे नव्हे, म्हणून बॅरिस्टर होण्याकरिता इंग्‍लंडलापाठवावे असे वडील बंधूंनी ठरविले. मोहनदासांना ही कल्पना फार आवडली. आई या धाकट्याला परदेशी पाठविण्यास नाखूष होती. परंतु मोहनदासांचा आग्रह पाहून तिने त्यांना मद्य, मांस व परस्त्री वर्ज्य करण्याची शपथ घ्यावयास लावली आणि ते १८८८ मध्ये इंग्‍लंडला गेले. या वेळी कस्तुरबाई गरोदर होत्या. अठराव्या वर्षीच हिरालालचा जन्म झाला. रामदास व देवदास नंतर काही वर्षांच्या अंतराने झाले. इंग्‍लंडमध्ये असताना गांधींनी शाकाहारी मंडळ स्थापन केले. वडिलांच्याच पायापाशी बसून हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती मित्रांच्या संवादांमध्ये अनेक धर्माच्या तत्त्वांचे जे विचार त्यांनी वारंवार ऐकले, ते इंग्‍लंडमध्ये गीता , बुद्धचरित्र व बायबल यांच्या वाचनाने अधिक दृढ झाले.

ते १० जून १८९१ रोजी बॅरिस्टर झाले. तत्पूर्वी लंडनची मॅट्रिक परीक्षाही ते उत्तीर्ण झालेच होते. स्वदेशी परतले. मातेचे निधन झाले होते, ही गोष्ट त्यांना परतल्यावर कळली. वडीलभावाने परदेशगमनाबद्दल त्यांच्याकडून प्रायश्चित्त घेवविले.

आफ्रिकेतील सत्याग्रहसंग्रामाचे प्रथम पर्व : भारतात आल्यावर त्यांनी मुंबई येथे वकिली सुरू केली पण जम बसेना. या वेळी इंग्रजी पद्धतीचा पोषाख ते करीत होते. पोरबंदराच्या एका मुसलमान व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील कज्‍जासाठी गांधींची गाठ घेतली व एका वर्षाच्या कराराने, १८९३ च्या एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत नेले. दरबानचा लक्षाधीश व्यापारी दादा अब्दुल्ला याने प्रिटोरिया येथील व्यापारी तय्यबजी यावर ४०,००० पौडांची फिर्याद केली होती. गांधींनी त्या दोघांचे मन वळवून कज्‍जाचा निकाल सामोपचाराने करवून घेतला. आफ्रिकेत सु. २० वर्षे गांधी राहिले. वकिलीचा अनुभव घेतला. दोन्ही पक्षांच्या अंतःकरणात शिरून व समजूत घालून, कज्‍जाचा निकाल करणे यात गांधी तरबेज झाले. दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील बिनगोऱ्या जमातींवरील विशेषतः हिंदी लोकांवरील, त्याचप्रमाणे तेथील मजुरांवरील होणाऱ्या गोऱ्या सत्ताधाऱ्यांच्या जुलमांविरुद्ध आपल्या सत्याग्रहाचा किंवा निःशस्त्र प्रतिकाराचा दीर्घकालपर्यंत प्रयोग करण्याची संधी त्यांनी साधली. तेथील हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती इ. जमातींची व दलित जनांची अंतःकरणे काबीज केली. अनेक यूरोपीय मित्रही मिळविले.

दक्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध तत्त्वज्ञ, सेनापती व सत्ताधारी जनरल स्मट्स यांच्याशीच गांधींनी अनेक वेळा सत्याग्रही संग्राम केला. त्या वेळी नाताळ, ट्रान्सवाल व ऑरेंज फ्री स्टेट या तीन स्वतंत्र राज्यांत हिंदी लोकांची स्थिती अस्पृश्यांपेक्षाही वाईट होती. हिंदू मजूर मुदतीच्या कराराने तेथे मोठ्या संख्येने नेले जात होते. हिंदी व्यापारीही तेथे व्यापाराकरिता वस्ती करून राहिले होते. सर्वच बिनगोऱ्या लोकांना निग्रोंप्रमाणेच वागवीत असत सर्वांनाच कुली म्हणत. गोऱ्या वस्तीत राहण्याचा त्यांना प्रतिबंध होता. वर्णद्वेषाचे थैमान सुरू होते. वर्णभेदावर आधारलेले अनेक प्रकारचे जुलमी कर लादले होते. वर्णद्वेषावर आधारलेले नियम मोडले, तर गोरे लोक व पोलीस मारहाण करीत बुटाने तुडवीत.

गांधींनी स्वतः अनेक वेळा असा अपमान व मारहाण सोसली. हिंदू लोकांच्या काही सवलती काढून घेणारे अपमानकारक बिल तेथील विधिमंडळात १८९४ मध्ये आले. गांधी त्या वेळी आफ्रिका सोडून स्वदेशी परतणार होते. परंतु आयत्या वेळी परत येण्याचा बेत रहित करून तेथेच राहून लढा देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. नाताळ इंडियन काँग्रेस नावाची संस्था त्याकरिता स्थापन केली. सार्वजनिक फंडातील पैसा न घेता वकिली सुरू करून अगदी साधी राहणी अवलंबिली. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले. सार्वजनिक फंड आंदोलनाकरिता गोळा होत असे त्याचा पूर्ण चोख हिशोब प्रतिमास सादर करण्याची प्रथा ठेवली. मजुरांवर तेथे राहण्याबद्दल जादा कर देण्याचे विधेयक विधिमंडळापुढे मान्य झाले होते. याविरुद्ध त्यांनी मोठी चळवळ केली. गोरे लोक त्यामुळे त्यांच्यावर खूप चवताळले होते. याच सुमारास १८९६ च्या जून महिन्यात गांधी भारतीयांना तेथील परिस्थिती समजावून सांगण्याकरिता तात्पुरते भारतास परतले. काही महिने भारतात राहून येथील वृत्तपत्रांत तेथील परिस्थितीबद्दल हृदयविदारक हकीकती त्यांनी प्रसिद्ध केल्या व दक्षिण आफ्रिकेत ते पुन्हा गेले. याच सुमारास बोअर युद्ध सुरू झाले. त्यात गांधीजींनी हिंदी लोकांचे शुश्रूषा पथक तयार करून दोन्ही बाजूंच्या गोऱ्या जखमी सैनिकांची सेवा केली. बोअर युद्धानंतर गांधींनी भारताला भेट दिली. १९०३ साली गांधी आफ्रिकेस पुन्हा परत गेले. तेथील दडपशाहीच्या कायद्याविरुद्ध त्यांनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. त्यात कस्तुरबांसह अनेक स्त्रियांनीही भाग घेतला आणि कारावास भोगला. काळ्या कायद्याविरुद्ध कायदेभंगाच्या चळवळीला १९०७ मध्ये उग्र रूप आले. १९०८ मध्ये शेकडो हिंदी लोकांना कारावासाच्या शिक्षा झाल्या. गांधींनाही सक्तमजुरीची शिक्षा झाली. या सत्याग्रहाचे पडसाद आफ्रिकेप्रमाणेच इंग्‍लंड व हिंदुस्थान येथेही उमटले. १९१२ साली गोपाळकृष्ण गोखले हे जनरल स्मट्‌सने काळा कायदा रद्द करावा, म्हणून आफ्रिकेत गेले. तेव्हापासून गांधी व गोखले यांचा स्‍नेह जमला. गोखले यांस गांधींनी आपले राजकीय गुरू म्हणून अत्यंत पूज्य मानले. १८ डिसेंबर १९१३ रोजी गांधींना स्मट्सने बंधमुक्त केले व २१ जानेवारी १९१४ रोजी वर्णविद्वेषाच्या कायद्याच्या बाबतीत गांधी व स्मट्स यांच्यात तडजोड झाली.

आफ्रिकेतील त्यांच्या वीस वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी रस्किनचे अनटू धिस लास्ट, टॉलस्टायचे किंग्डम ऑफ गॉड व थोरोचे निबंध वाचले. रस्किनच्या पुस्तकाचे त्यांनी सर्वोदय म्हणून गुजरातीत भाषांतर केले. दरबान शहराजवळ सु. चाळीस हे. जमीन खरेदी करून फिनिक्स आश्रम स्थापन केला. तेथूनच ते इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक छापून प्रसिद्ध करू लागले. गांधी स्वतः शेतकाम करीत, छापखान्यात यंत्रेही फिरवीत. नंतर त्यांनी जोहॅनिसबर्गजवळ सु. ४४० हे. जागेत टॉलस्टाय फार्म स्थापिला. १९१३ मधील सत्याग्रह आंदोलनाची छावणी येथेच पडली होती. तत्पूर्वी त्यांनी १९०८ साली लंडनहून दक्षिण आफ्रिकेस परत जात असताना हिंद स्वराज्य हे पुस्तक प्रश्नोत्तररूपाने लिहून प्रसिद्ध केले. या पुस्तकात यांत्रिक उद्योगाने मानवाचा ऱ्हास होत आहे, हा विचार त्यांनी मांडला.

भारतातील सार्वजनिक जीवन  : गांधी दक्षिण आफ्रिकेला कायमचा रामराम ठोकून इंग्‍लंडमार्गे ९ जानेवारी १९१५ रोजी मुंबईस परत आले. नामदार गोखले यांनी, भारतात गेल्यावर एक वर्षपर्यंत सार्वजनिक चळवळीत न पडता केवळ तटस्थपणे परिस्थिती समजावून घ्या, असे त्यांना बजावून सांगितले होते. मुंबई, मद्रास इ. शहरांमध्ये त्यांच्या सत्काराच्या सभा झाल्या. गांधींनी हरद्वारचे गुरुकुल व शांतिनिकेतन यांस भेटी दिल्या. हरद्वार येथे कांगडी गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद यांची गाठ पडली. त्यांनीच प्रथम गांधींचा महात्मा म्हणून निर्देश करून गौरव केला. अहमदाबाद येथे साबरमती तीरावर २५ मे १९१५ रोजी सत्याग्रहाश्रम स्थापन केला. आश्रमात राहणाऱ्या एका अस्पृश्यामुळे अहमदाबाद येथील व्यापा ऱ्यांनी आश्रमास देणग्या देण्याचे बंद केले. आश्रम बंद पडण्याची वेळ आली. परंतु गांधींनी अस्पृश्यांना आश्रमात ठेवण्याचा आग्रह चालू ठेवला. हळूहळू पुन्हा अनुदान मिळू लागले व आश्रम स्थिरावला. विनोबा भावे, काकासाहेब कालेलकर, संगीतज्ञ खरे गुरूजी, गोपाळराव काळे, महादेवभाई देसाई, जे. बी. कृपलानी, किशोरलाल मश्नुवाला, प्यारेलाल इ. गांधींचे अनुयायी आश्रमी बनले. हा सत्याग्रहाश्रम तेव्हापासून हळूहळू भारताच्या राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र बनला.

हिंदू विश्वविद्यालयाचा स्थापना समारंभ ४ फेब्रुवारी १९१६ रोजी झाला त्या सभेत व्हाइसरॉय लॉर्ड हर्डिंग, ॲनी बेझंट, हिंदी महाराजे, त्यांच्या राण्या, उच्चपदस्थ अधिकारी व अनेक पुढारी उपस्थित होते. या सभेत गांधींनी भाषण केले. ते म्हणाले, ‘कालच्या चर्चेमध्ये भारताच्या गरिबीबद्दल मुक्त कंठाने भाषणे झाली. पॅरिसच्या जवाहि ऱ्यालाही दिपवून टाकणाऱ्या जडजवाहिरांनी मंडित राजेमंडळी येथे बसलेली आहेत. भारताची गरिबी नष्ट करावयाची तर अगोदर, डोळे दिपविणारे जडजवाहिर राजेमहाराजांपाशी आहेत, तेच काढून घेऊन याचा भारताच्या जनतेकरिता निधी निर्माण करावा. हे सर्व धन गरीब शेतकऱ्यांच्या श्रमातून निर्माण झाले आहे. शेतकऱ्याची मुक्ती शेतकरीच करू शकेल. वकील, डॉक्टर, जमीनदार हे करू शकणार नाहीत’. अशा अर्थाचे भाषण चालू असताना ॲनी बेझंट यांनी गांधींना हटकले व भाषण बंद करण्यास सांगितले. गांधी थांबले नाहीत. बेझंटनी ती सभा रागावून बरखास्त केली.  

गांधींनी १९१७ मध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बिहारमधील चंपारण्यास भेट दिली. त्या परिसरात गोऱ्या लोकांचे उसाचे व निळीचे मळे होते व तेथील हिंदी शेतकरी त्यांची कुळे होती. हे मळेवाले शेतकऱ्यांना छळीत, लुबाडीत, मारीत व त्यांची आर्थिक पिळवणूक करीत. ब्रिटिश सरकारने गांधींना चंपारण्य सोडून जाण्याचा हुकूम दिला. तो गांधींनी मानला नाही. या वेळी राजेंद्रप्रसाद, ब्रिजकिशोर, मझरूल हक इत्यादींचा परिचय झाला. चंपारण्य जिल्ह्यातील ८५० खेड्यांतील सु. ८,००० शेतकऱ्यांच्या तक्रारी गांधींनी लिहून घेतल्या. १३ जून १९१७ रोजी सरकारला चौकशी समिती नेमावी लागली. समितीच्या शिफारशीप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांकडून खंड कमी घेतला जाईल, वेठबिगार रद्द होईल व इतर जुलमी प्रकार होणार नाहीत, असे १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केले.

चंपारण्य सत्याग्रहामुळे गांधींजींचे भारतीय नेतृत्त्व चमकू लागले. त्यानंतर अहमदाबादच्या मजुरांच्या तुटपुंज्या पगाराचा प्रश्न उत्पन्न झाला. युद्धजन्य महागाई शिगेस पोहोचली होती. मजुरांचा सत्तर टक्के बोनस गिरणीवाल्यांनी रद्द करण्याचे जाहीर केले. सु. ८०,००० मजुरांनी सत्याग्रह करण्याचा बेत केला. बावीस दिवस संप चालला. गांधींनी मजुरांचा संप टिकविण्यासाठी उपोषण केले. तीन दिवसांत यश आले. मालकांनी ३५% पगारवाढ मान्य केली. असे तंटे पुन्हा होऊ नयेत म्हणून मजुर-महाजन नावाची संस्था स्थापन झाली. मजुरांप्रमाणे शेतकऱ्यांचाही प्रश्न याच साली उत्पन्न झाला. खेडा जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला तरी सरकार, चार आणेच पीक येऊन देखील, शेतसारा वसूल करू लागले. गांधींनी करबंदीची चळवळ हाती घेतली. ही चळवळ पसरू लागली, म्हणून सरकार नमले व शेतसारा माफ झाला.

पहिल्या जागतिक युद्धात भारतीयांनी मित्र राष्ट्रांना मदत करावी, म्हणून १९१७ साली व्हाइसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड याने भारतीयांची परिषद बोलाविली. त्या परिषदेत गांधींनी हिंदीमध्ये भाषण करून सैन्यभरतीला पाठिंबा दिला. या बाबतीत लोकमान्य टिळकांचे असे म्हणणे होते, की भारतीयांना स्वराज्याच्या अधिकारांचे आश्वासन मिळाले, तरच सैन्यभरतीला पाठिंबा द्यावा. गांधींनी बिनशर्तच पाठिंबा दिला. दक्षिण आफ्रिकेतील चळवळीपासून गांधींचा व दीनबंधू सी. एफ्. अँड्रूज या ख्रिस्ती धर्मप्रचारकाचा स्‍नेहजमला होता. ब्रिटिश सरकारचे भारतातील प्रतिनिधी आणि गांधी यांच्यामधला अँड्रूज हे एक महत्त्वाचा दुवा बनले. सैन्यभरतीच्या प्रचाराकरिता देशभर फिरत असता गांधींची प्रकृती अत्यंत परिश्रमाने ढासळली. अतिसाराचा विकार जडला. अंगात बारीक तापही सारखा राहू लागला. खेडा जिल्ह्याच्या सत्याग्रहापासून वल्लभभाई पटेल यांचा स्‍नेहसंबंध वाढू लागला होता.वल्लभभाई अहमदाबादला गांधींना भेटावयास आले. वल्लभभाईंनी औषधोपचार घ्यावा, असा त्यांना आग्रह केला. सुप्रसिद्ध डॉक्टर कानुगा यांनी प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून औषधे व इंजेक्शन्स घेण्याचा आग्रह केला. गांधींनी तो नाकारला. एके दिवशी रात्री या दीर्घ आजारात गांधींना वाटू लागले, की आपली अखेरची वेळ आली आहे. वल्लभभाईंनी पुन्हा डॉ. कानुगांना प्रकृती तपासण्यास बोलाविले, त्यांनी नाडी तपासली. डॉक्टर म्हणाले, तशी भीती नाही, अत्यंत अशक्ततेमुळे मात्र मज्‍जातंतू क्षीण झाले आहेत. शेवटी एकच उपाय उपयोगी पडला सर्व शरीराला बर्फाचा लेप केला होता. गांधी या आजारातून बाहेर पडले. निसर्गोपचारावर त्यांची फार भिस्त. आश्रमात कोणी आजारी पडले, तरी उपवास व निसर्गोपचार यांवरच ते भर देत.

जर्मनांचा पराभव होऊन पहिले जागतिक युद्ध १९१८ साली संपले ब्रिटन विजयी झाले. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुसलमानांची खिलाफत तोडून तिचे अनेक भाग केले. भारतातील मुसलमान त्यामुळे संपप्त झाले. ब्रिटिश सरकारने माँटेग्यू-चेम्सफर्ड समिती भारताच्या राजकीय हक्कांसंबंधी शिफारशी करण्याकरिता नेमली. त्यात स्वराज्याचे हक्क नव्हतेच. लोकप्रतिनिधींची कायदेमंडळे व द्विदल राज्यपद्धती देण्याचे मात्र ठरले परंतु गव्हर्नरांचे व केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकार कायम ठेवले. भारतात असंतोष पसरत होता. तो दाबून टाकण्याकरिता न्यायमूर्ती रौलट याच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशींप्रमाणे दडपशाहीचा कायदा केंद्र सरकारने मंजूर केला. या कायद्याच्या विरुद्ध गांधींनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. गांधींनी भारतभर दौरा सुरू केला. ६ एप्रिल १९१९ रोजी देशभर हरताळ पाळण्यात आला. हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये प्रचंड एकजूट घडून आली. पंजाब सरकारने पंजाबमध्ये शिरण्याची गांधींना मनाई केली. पंजाब सरकारने त्यांना अटक करून परत मुंबईला पाठविले. देशभर हाहाकार उडाला. जालियनवाला हत्याकांडामुळे गांधींनी सुरू केलेला सत्याग्रह तात्पुरता तहकूब केला. काँग्रेसने पंडित मदनमोहन मालवीय, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, उमर सोमानी इत्यादिकांची पंजाबात अथवा अन्यत्र झालेल्या अत्याचारांच्या चौकशीकरिता १४ ऑक्टोबर १९२१ रोजी सरकारने लॉर्ड हंटर यांच्या अध्यक्षतेखाली पाच गोरे व तीन हिंदी गृहस्थ यांची समिती नेमली. या समितीपुढे सत्याग्रहाचे प्रवर्तक म्हणून गांधींचीही साक्ष झाली. काँग्रेस समितीने असा निर्णय दिला, की लोकांना हिंसक मार्गापासून परावृत्त करण्याकरिता हरताळ पाळण्यात आला होता. सत्याग्रहाची चळवळ हे सरकारविरुद्ध बंड होते परंतु सरकारच्याही हातून अन्याय झाले, अशी कबुली हंटर समितीने दिली. १९२० साली नागपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले त्यात असहकारितेचे आंदोलन सुरू करण्याचा ठराव मान्य करण्यात आला. खिलाफतीचे पुनरुज्‍जीवन करण्याची चळवळही याच चळवळीबरोबर उभारली. देशभर सभा, मिरवणुका, प्रभात फेऱ्या निघू लागल्या. कायदेमंडळांवर देशातील शेकडो प्रतिनिधींनी बहिष्कार घातला. हजारो लोकांनी सरकारी नोकऱ्या सोडल्या. अनेक वकिलांनी व बॅरिस्टरांनी वकिलीची कामे सोडली. परदेशी मालावर व ब्रिटिश कापडावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन देशभर पसरले. राष्ट्रीय शिक्षणाच्या खाजगी संस्था स्थापण्यात आल्या. परंतु ब्रिटिश सरकारने दडपशाही सुरू केली. लक्षावधी लोकांना कारावासात टाकले. गांधींनी या अनत्याचारी असहकारितेची शेवटची पायरी म्हणून सामुदायिक कायदेभंग व करबंदी करण्याच्या चळवळीचा संकल्प सोडला. बार्डोली तालुक्यात ही चळवळ सुरू करावयाचे ठरविले. गांधींनी बार्डोली येथेच आपला मुक्काम ठेवला. परंतु उत्तर प्रदेशात चौरीचौरा येथे दंगे होऊन लोकांनी जाळपोळ केली व त्यात पोलिसांची हत्या झाली. त्यामुळे गांधींनी काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीची बार्डोली येथे ११ व १२ फेब्रुवारी १९२२ रोजी बैठक बोलावून बार्डोलीचा सत्याग्रह तहकूब ठेवला. महात्मा गांधींना त्यानंतर १० मार्च रोजी अहमदाबाद येथे पकडण्यात येऊन राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. गांधींनी न्यायालयापुढे आपण राजद्रोह केला हे मान्य केले व सांगितले: ब्रिटिश राज्यपद्धती आणि तिचा कायदा हा भारतीय जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे. मी बादशहाविरुद्ध अप्रीती उत्पन्न केली नाही, तर ब्रिटिशांच्या राज्यपद्धतीविषयी अप्रीती उत्पन्न केली आहे. अशी अप्रीती उत्पन्न करणे हे कर्तव्य व सद्‍गुणाचे दर्शन मी समजतो. न्यायाधीश ब्रुमफील्ड यांनी निकाल देताना सांगितले:तुमचे ध्येय उच्च व तुमचे वर्तन थोर साधूला शोभण्यासारखे आहे. परंतु तुमच्या सत्याग्रहाचा उद्देश उच्च व प्रयत्‍न अत्याचाराविरुद्ध असले तरीही अत्याचार घडले म्हणून तुम्हास मोठ्या खेदाने मला शिक्षा सुनवावी लागत आहे. सहा वर्षांच्या साध्या कैदेची शिक्षा मी फर्मावितो. येरवडा जेलमध्ये गांधींना रवाना केले. तेथे १९२४ साली त्यांचा आंत्रपुच्छशोथ हा विकार बळावला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ५ फेब्रुवारीला त्यांना मुक्त करण्यात आले.

त्यानंतर गांधींनी ब्रिटिश राज्यकर्त्यांशी लढा न करता, सामाजिक सुधारणांसारख्या विधायक कार्यक्रमास वाहून घेतले. मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, विठ्ठलभाई पटेल इ. काँग्रेस नेत्यांनी स्वराज्य पक्ष स्थापून कायदेमंडळात स्वराज्याच्या हक्कांकरिता झगडायचे ठरविले. हिंदु-मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यतानिवारण, खादीग्रामोद्योग, गावसफाई इ. कार्यक्रम गांधींनी हाती घेतले. गांधींनी देशभर प्रवास करून प्रचार केला. राजगोपालाचारी, जवाहरलाल नेहरू हे गांधींच्याच विधायक कार्यक्रमात सहकार्य करू लागले आणि गांधींच्या कार्यक्रमाचे ते समर्थक बनले. काँग्रेसमधील एम्. आर्. जयकर, न. चिं. केळकर, मदनमोहन मालवीय इ. मंडळी, मुसलमानांचे मन वळविणे अशक्य आहे, असे म्हणून हिंदू महासभेकडे वळली. काँग्रेसमधील अनेक मुसलमान नेते, बॅ. जिना, सर अली इमाम यांनी डिसेंबर १९२५ मध्ये अलीगढ येथे मुस्लिम लीगचे अधिवेशन भरवून मुसलमानांची फळी उभी केली.

भारतातील राजकीय असंतोष केंद्राच्या व प्रांतांच्या विधिमंडळांत शिरलेल्या स्वराज्य पक्षाच्या द्वारे वारंवार प्रकट होऊ लागला हे पाहून नवे आंदोलन उद्‍भवण्याच्या अगोदरच राजकीय स्वयंनिर्णयाचे हक्क वाढवावे, म्हणून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सायमन आयोग नेमण्याचे ठरविले. ३ फेब्रुवारी १९२८ रोजी सायमन आयोग मुंबई बंदरात उतरला. तेव्हापासून त्याविरुद्ध निदर्शने सुरू झाली. देशभर ब्रिटिशविरोधी निदर्शनांचे थैमान सुरू झाले. काँग्रेसने सायमन आयोगावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. लाहोरला लाला लजपतराय व लखनौला जवाहरलाल नेहरू यांच्यावर उग्र निदर्शने चालू असताना लाठीहल्ला झाला. लाला लजपतराय या लाठीहल्ल्याने उत्पन्न झालेल्या दुखण्यातच कालवश झाले. भारताचे राजकीय वातावरण तप्त झाले, हे पाहून पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे उद्दिष्ट संपूर्ण स्वातंत्र्य जाहीर करण्याचे ठरविले. गांधी साम्राज्यांतर्गत स्वराज्याचे समर्थक होते. या दोघांना त्यांनी आश्वासन दिले, की ३१ डिसेंबर १९२९ पर्यंत साम्राज्यांतर्गत स्वराज्य मिळाले नाही, तर मी संपूर्ण स्वातंत्र्यवाला होईन. त्याच सुमारास भगतसिंग इ. सशस्त्र क्रांतिकारकांच्या हालचाली सुरू झालेल्या गांधींच्या लक्षात आल्या. लॉर्ड आयर्विन यांच्या आगगाडीखाली नवी दिल्ली स्टेशनजवळ बाँबस्फोट झाला. भारताच्या राजकीय चळवळीला हिंसक वळण मिळणार असे दिसू लागले. ते टाळण्याकरिता गांधींनी १९३० साली सविनय कायदेभंगाची घोषणा केली. १२ मार्च १९३० रोजी सकाळी ६·३० वाजता साबरमती आश्रमातून गांधींनी स्वराज्य मिळाल्याशिवाय परत येणार नाही अशी प्रतिज्ञा करून समुद्र किनाऱ्यावरील दांडीकडे मिठाचा कायदा तोडण्याकरिता ७२ सत्याग्रही वीरांसह यात्रा सुरू केली. ६ एप्रिलला यात्रा संपली. गांधींनी बेकायदेशीर रीतीने मीठ गोळा केले. देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले. ४ मे १९३० रोजी पहाटे गांधींना कराडी या गावी अटक झाली येरवड्याच्या तुरुंगात सरकारने त्यांची रवानगी केली. देशामध्ये लक्षावधी लोक कायदेभंग करून कारावासाची शिक्षा भोगू लागले. २५ जानेवारी १९३१ रोजी शांततामय वातावरण निर्माण करण्याकरिता लॉर्ड आयर्विन यांनी गांधींची बिनशर्त सुटका केली. गांधी आणि आयर्विन यांच्यात वाटाघाटी सुरू होऊन ५ मार्च १९३१ रोजी ⇨ गांधी – आयर्विन   करार झाला.

भारताच्या राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा प्रश्न चांगल्या रीतीने सोडविण्याकरिता इंग्‍लंडमध्ये नोव्हेंबर १९३१ मध्ये भारतीय प्रतिनिधींची गोलमेज परिषद भरली. गांधी त्या परिषदेस उपस्थित राहिले. इंग्‍लंडमध्ये त्या वेळी कमरेला पंचा, अंगावर उबदार साधी शाल व पायात वहाणा असा त्यांचा पोषाख होता. गोलमेज परिषदेमध्ये भाषण करताना गांधींनी सांगितले, की ब्रिटिश प्रजाजन म्हणविण्यात मला एके काळी अभिमान वाटत होता आता बंडखोर म्हणून घेणे मला जास्त आवडेल. हिंदू, मुसलमान, स्पृश्य व अस्पृश्य यांना विभक्त मतदार संघ द्यावे की नाही याबद्दल तेथे हिंदी प्रतिनिधींमध्ये मतभेद झाले. अशा प्रकारची जातीयता स्वराज्यात राहू नये, त्याकरिता प्राण गेले तरी चालतील, असे गांधींनी त्या परिषदेत निकराने जाहीर केले. भारतात आल्यावर ३ जानेवारी १९३१ रोजी गांधींना अटक झाली.  त्यानंतर वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, राजेंद्रबाबू, सुभाषचंद्र बोस, डॉ. अन्सारी, आझाद, कस्तुरबा, कमला नेहरू इ. राष्ट्रीय नेत्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली. १८ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी डॉ. भी. रा. ऊर्फ बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहावरून अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिल्याचे जाहीर केले. हे ऐकल्यानंतर गांधींनी २० सप्‍टेंबर रोजी या प्रश्नावर प्राणांतिक उपोषण सुरू केले. डॉ. आंबेडकरांशी त्यांनी वाटाघाटी केल्या. तारीख २६ रोजी गांधींचा जीव वाचविण्याकरिता डॉ. आंबेडकरांनी तडजोड केली व येरवडा करार झाला. ८ मे १९३३ पासून त्यांनी पापाचे प्रायश्चित म्हणून २१ दिवसांचे उपोषण सुरू केले. सरकारने त्यांची लगेच मुक्तता केली. १२ जुलै १९३३ रोजी गांधींनी सामुदायिक सत्याग्रहाचे आंदोलन मागे घेतले परंतु त्यांनी १९३४ मध्ये वैयक्तिक कायदेभंग सुरू केला. त्यातही पुन्हा त्यांना एक वर्षाची कैदेची शिक्षा झाली. परंतु पुन्हा उपोषण सुरू केल्यामुळे सरकारने त्यांची काही दिवसांनी मुक्तता केली. जानेवारी १९३४ मध्ये बिहार येथे भयंकर धरणीकंप झाला. हजारो लोक मेले, लाखो घरे जमीनदोस्त झाली. गांधींनी भूकंपग्रस्त भागात फिरून लोकांची सेवा केली. गांधींनी शेट जमनालाल बजाज या आपल्या एका थोर अनुयायाच्या सांगण्यावरून वर्धा येथील सेवाग्राम येथे आश्रम स्थापन केला. तेथे ते अखेरपर्यंत राहिले आणि विधायक कार्यक्रमाला पुन्हा त्यांनी वाहून घेतले.

त्यांनी १९३८ मध्ये बंगालचा दौरा केला. बंगाल हे सशस्त्र क्रांतिकारकांचे केंद्रस्थान होते. शेकडो सशस्त्र क्रांतिकारक कारावासात खितपत पडले होते. त्यांना ब्रिटिश सत्ताधाऱ्यांशी विचारविनिमय करून त्यांनी बंधमुक्त केले.

प्रांतिक व केंद्रीय निवडणुकींत १९३७ मध्ये बंगाल व पंजाब सोडून बहुतेक प्रांतांमध्ये काँग्रेस बहुमताने निवडून आली. सात प्रांतांमध्ये काँग्रेस मंत्रिमंडळांचे राज्य झाले होते. दुसरे जागतिक महायुद्ध १९३९ मध्ये सुरू झाले. युद्धसहकार्य नाकारून गांधींच्या सल्ल्याप्रमाणे या काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. बॅ. जिनांच्या सल्ल्यानुसार मुस्लिम लीगने काँग्रेस मंत्रिमंडळ बरखास्त झाल्यामुळे देशभर मुक्तिदिन साजरा केला. १९४१ च्या एप्रिलमध्ये गांधींनी पुन्हा वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. भारतात शांतता नांदावी व युद्धप्रयत्‍नाससाहाय्य व्हावे, म्हणून ११ मार्च रोजी भारताला स्वराज्याचे हक्क युद्ध संपल्याबरोबर द्यावेत असे चर्चिल यांच्या मंत्रिमंडळांने ठरवून सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स यांचा आयोग भारताकडे पाठविला. गांधीप्रभृती नेते आणि क्रिप्स यांच्यात वाटाघाटी झाल्या परंतु त्या अखेर फिसकटल्या. याचे कारण गांधींना युद्धसहकार्य करायचे नव्हते. गांधींनी ब्रिटिशांना विरोध न करण्याचे युद्धारंभीचे धोरण नंतर बदलले होते. म्हणून त्या वेळचे व्हाइसरॉय वेव्हेल यांनी गांधी शब्दाचे पक्के नव्हते, अशा अर्थाचे विधान या संदर्भात केले असावे. गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीची मुंबई येथे बैठक बोलाविली. त्या बैठकीत त्यांनी भारत स्वतंत्र झाला आहे, असा निर्णय जाहीर केला आणि छोडो भारत आंदोलन देशभर सुरू केले. गांधींनी लोकांना सांगितले, की करा किंवा मरा. ९ ऑगस्ट रोजी गांधींसह शेकडो नेत्यांची धरपकड झाली आणि त्यांना कारागृहात डांबण्यात आले. गांधींना पुणे येथील आगाखान बंगल्यात स्थानबद्ध केले. त्यांच्याजवळ कस्तुरबा, महादेव देसाई, डॉ. गिल्डर, डॉ. सुशील नायर, सरोजिनी नायडू इत्यादींना ठेवले. महादेव देसाई हे गांधींचे चिटणीस. त्यांना तेथेच मृत्यू आला. गांधींच्या पत्‍नी कस्तुरबा ह्या हृदयविकाराने आजारी होत्या. २२ फेब्रुवारी १९४३ रोजी त्यांना मृत्यू आला.  या अत्यंत प्रियजनांचा वियोग गांधींनी मोठ्या धैर्याने सहन केला. कस्तुरबांनी गांधींबरोबर मोठ्या निष्ठेने आदर्श पतिव्रता म्हणून जीवन व्यतीत केले. ६ मे १९४४ साली गांधीजींची बिनशर्त मुक्तता झाली. २ ऑक्टोबर १९४४ रोजी एक कोटी बारा लाखांचा कस्तुरबा निधी सेवाग्राम येथे गांधींच्या स्वाधीन करण्यात आला. काँग्रेस कार्यकारिणीचे जवाहरलाल नेहरूप्रभृती सभासद व अन्य नेते यांची जून १९४५ मध्ये कारागृहातून मुक्तता झाली. १९४६ मध्ये इंग्‍लंडमध्ये मजूर पक्षाचे मंत्रिमंडळ ॲटली यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झाले. त्यांनी मे १९४६ मध्ये भारताच्या स्वराज्याची योजना तयार केली. संविधान परिषद व हंगामी राष्ट्रीय मंत्रिमंडळ बनविण्याचा अधिकार भारताला त्या योजनेप्रमाणे मिळाला. २९ जुलै १९४६ रोजी मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या मागणीकरिता आंदोलन उभारले. भारताची फाळणी अपरिहार्य झाली. गांधींना ती मुळीच मान्य नव्हती. एक वेळ माझ्या देहाचे दोन तुकडे पडले तरी चालेल, पण भारताची फाळणी मी होऊ देणार नाही, असे गांधींनी जाहीर केले. परंतु ३ जून १९४७ रोजी जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल इ. नेत्यांनी भारताची फाळणी मान्य केली. या सुमारास हिंदु-मुसलमानांचे यादवी युद्ध देशभर पेटले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे स्वातंत्र्य जाहीर झाले. हिंदु-मुसलमानांच्या भयंकर कत्तली चालूच होत्या. गांधींनी दिल्लीतील वातावरण शांत होईपर्यंत उपोषण करण्याचे जाहीर केले. १३ जानेवारी १९४८ रोजी बेमुदत उपोषण सुरू केले. भारत सरकारने पाकिस्तानचे ५५ कोट रु. परत करावे, अशी गांधींची मागणी होती. ही मागणी वल्लभभाई प्रभृती नेत्यांना मान्य नव्हती परंतु गांधींचा जीव वाचविण्याकरिता ती अखेर मान्य करावी लागली. १६ जानेवारी रोजी गांधींनी उपोषण सोडले.

३० जानेवारी १९४८चा दिवस उजाडला. काँग्रेसने सत्तेचा स्वीकार न करता जनतेच्या दारिद्याचे प्रश्न सोडवावेत, विधायक कार्यक्रमाला वाहून घ्यावे, म्हणून लोकसेवक संघ योजना गांधींनी तयार केली. ग्रामराज्य हा भारतीय स्वराज्याचा पाया बनावा, असे भारताच्या संविधानाचे तत्त्व तीत समाविष्ट केले. राष्ट्रीय मंत्रिमंडळात पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात तीव्र मतभेद उद्‍भवले होते. गांधीजींनी सरदारांना पटविले, की ही फूट देशास अहितकारक आहे. संध्याकाळी पाच वाजले. बिर्ला भवनमधून गांधी प्रार्थनास्थानाकडे जावयास निघाले. प्रार्थनास्थानाकडे जातानाच पुण्याचे नथुराम गोडसे हे नारायण आपटे या साथीदारासह त्या प्रार्थनेच्या सभेत शिरले. गांधींच्या जवळ जाऊन प्रणाम करून नथुराम गोडसे यांनी गांधींच्या अंगावर गोळ्या झाडल्या. गांधी ‘हे राम’ म्हणत धरणीवर पडले आणि गतप्राण झाले. भारतीय जनता दुःखसागरात बुडाली. जगातील मोठमोठे नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ, विज्ञानवेत्ते, कलाकार दुःखाने व्यथित झाले. सर्वश्रेष्ठ विज्ञानवेत्ते ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांनी ही वार्ता कळल्याबरोबर उद्‍गार काढले, की असा महान माणूस या भूतलावर वावरत होता, याचेच आश्चर्य वाटते. अनेक तत्त्ववेत्त्यांनी म्हटले, की मानव जातीला पापातून मुक्त करणारा व शांततेचे मानवी विश्व भविष्यकाली निर्माण होईल, अशी आशा निर्माण करणारा हा माणूस होता. ‘राष्ट्रपिता’ म्हणून सर्वश्रेष्ठ अद्वितीय बहुमान गांधींना प्राप्त झाला.

वृत्तपत्रकार गांधी : गांधींनी आपल्या राजकीय विचारसरणीचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्याकरिता ७ एप्रिल १९१९ पासून सत्याग्रही ह्या संपादकीय नावाखाली सत्याग्रह नावाचे साप्ताहिक सरकारी परवान्याशिवाय प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. मुंबईस बॉम्बे क्रॉनिकल   नावाचे दैनिक बी. जी. हर्निमन यांनी चालविले होते. गांधींनी त्याचे संपादक व्हावे, अशी त्यांना विनंती करण्यात आली. गांधींनी नाखुषीने कबुली दिली परंतु सरकारने ते दैनिक प्रकाशित करण्यास मनाई केली, हुकूम सोडला. गांधीजींच्या ते पथ्यावर पडले.काही गुजराती मंडळींनी यंग इंडिया  हे नियतकालिक सुरू केले होते. त्याचे संपादक व्हावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. यंग इंडिया (इंग्रजी) व नवजीवन (गुजराती) ही नियतकालिके १९१९ पासून गांधीजींच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होऊ लागली. नवा विचार, नवी भाषा, नवी वृत्तपत्रपद्धती आणि कसल्याही जाहिराती नसणे, ही या नियतकालिकांची वैशिष्ट्ये होती. ना फायदा ना तोटा या पद्धतीने ही प्रकाशने चालू राहिली. चरखा व स्वदेशी, हरिजन सेवा, सत्याग्रहाचे व असहकारितेचे आंदोलन, आध्यात्मिक जीवनपद्धती, अहिंसेचा महिमा, ग्रामोद्योग, हिंदु-मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यतानिवारण इ. विषयांवर सुंदर इंग्रजीत व गुजरातीमध्ये लेखन प्रसिद्ध होऊ लागले. गांधींच्या शैलीतून वाचकांना विलक्षण प्रेरणा मिळत होती. ११ फेब्रुवारी १९३३ रोजी हरिजन (इंग्रजी) साप्ताहिक गांधींनी सुरू केले. त्या वेळी ते येरवडा तुरूंगात होते. हरिजन ची हिंदी आवृत्तीही निघू लागली. यंग इंडिया बंद झाला होता. ८ ऑगस्ट १९४२ च्या चळवळीत गांधींना अटक झाल्यावर हरिजन वृत्तपत्रही बंद पडले. १० फेब्रुवारी १९४६ रोजी पुन्हा त्याचे प्रकाशन सुरू झाले. गांधीनिधानानंतर १५ फेब्रुवारी १९४८ रोजी हरिजन पत्रही प्रकाशित होण्याचे बंद पडले.

जोशी, लक्ष्मणशास्त्री

साहित्यिक गांधी : उत्कट कथनेच्छा हा गांधीजींच्या गुजराती व इंग्रजी लेखनाचा प्रमुख हेतू असल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत प्रभावी, हृदयस्पर्शी आणि साहित्यगुणांनी युक्त ठरले आहे. साहित्यात भाषेची स्वाभाविकता व हृदयाचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी बाराव्या गुजराती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन केले. सत्यना प्रयोगो अथवा आत्मकथा (१९२७) हे त्यांचे विश्वविख्यात आत्मचरित्र म्हणजे आत्मचरित्रलेखनाचा एक चांगला नमुना होय. ह्या आत्मचरित्राची आजवर अनेक देशी आणि विदेशी भाषांत भाषांतरे झालेली आहेत. गुजराती गद्याला त्यामुळे नवे सामर्थ्य प्राप्त झाले. गुजराती भाषेचा पहिला प्रमाणभूत शब्दकोश ( जोडणीकोश ) तयार करून त्यानी अशुद्ध लेखनाच्या अराजकतेपासून गुजराती भाषेला वाचविले. इतकेच नव्हे, तर गुजराती भाषा-साहित्याचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी आपल्या सहका ऱ्यांच्या मदतीने अहमदाबाद येथे गुजरात राष्ट्रीय विद्यापीठाचीही स्थापना केली (१९२०). गांधीजींचा गुजराती भाषा-साहित्यावरील प्रभाव फार मोठा आहे आणि त्यामुळेच गुजराती साहित्याच्या इतिहासात ‘गांधी युग’ असा स्वतंत्र कालखंड मानला जातो. काकासाहेब कालेलकर, महादेवभाई देसाई, किशोरीलाल मश्रुवाला इ. थोर साहित्यिक त्यांच्या प्रभावातूनच निर्माण झाले. गांधीजींनी जीवनाभिमुख साहित्याचा आणि मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार केला. त्यांनी प्रभावित होऊन सुंदरम्, उमाशंकर जोशी, मेघाणी, धूमकेतू, रमणलाल देसाई इ. साहित्यिकांनी कथा, काव्य, कादंबरी इ. प्रकारांतील उत्तम साहित्यनिर्मिती करून ह्या मूल्यांचे संवर्धन केले.

गांधीजींनी नियतकालिकांतून केलेले वैचारिक लेखन प्रासंगिक असून ते धर्म, नीती, समाज, शिक्षण, राजकारण, अर्थशास्त्र, आरोग्य इ. विषयांवर आहे. त्यांचा पत्रव्यवहारही विस्तृत व विविधविषयस्पर्शी आहे. त्यांचे हे सर्व लेखन व पत्रव्यवहार मंगल प्रभात (१९३०), धर्ममंथन, बापूना पत्रो (११ भागांत, १९४९ ते १९७२) इ. ग्रंथांतून संगृहीत आहे. त्यांच्या लेखांतील व पत्रांतील भाषा साधी, सरळ व स्वाभाविक आहे. सर्वसामान्य माणसालाही आपला आशय स्पष्ट व्हावयास हवा, असा त्यांचा कटाक्ष व आग्रह असे. 

त्यांचे महत्त्वाचे इतर ग्रंथ दक्षिण आफ्रिकाना सत्याग्रहनो इतिहास (१९२४), नातिनाशने मार्गे (१९२७), त्यागमूर्ति अने  बीजा लेखो (१९३०), गांधीजीनी आखरी हाकल (१९४२), आरोग्यनी चावी (१९४८), मूरखराज (१९६४) हे होत.

पेंडसे, सु. न.

गांधीवाद : गांधीवाद म्हणून एक स्वतंत्र विचारपद्धती आहे. ही विचारपद्धती अध्यात्मवादावर आधारलेली आहे. किंबहुना तो विशिष्ट प्रकारचा अध्यात्मवाद आहे. गांधीवाद म्हणून काही नाही, ती एक जीवनपद्धती आहे, असे अनेक गांधीवाद म्हणत असले किंवा गांधींनीही तसे म्हटले असले, तरी गांधींनी विपुल लेखनामध्ये प्रतिपादिलेली ती एक स्वतंत्र विचारसरणी आहे, हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. तिचा प्रभावही आधुनिक जगाच्या सामाजिक व राजकीय विचारसरणींवर पडल्याशिवाय राहिलेला नाही. 

गांधी स्वतः मनाने पक्के हिंदू होते, तरी तत्त्वतः धर्मदृष्ट्या जगातील प्रसिद्ध धर्मांमध्ये मूलभूत ऐक्य आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि जगातील सर्व धर्मांना व्यापणारे रहस्य आपणाला प्राप्त झाले आहे, अशी त्यांची भावना होती.

सर्वच धर्मग्रंथांचे प्रामाण्य एका अर्थी त्यांनी मानले आहे परंतु शब्दशः प्रामाण्य त्यांना मान्य नाही. त्यांच्या मते, सर्वच धर्मग्रंथ मानवप्रणीत– ऋषी, प्रेषित, संत इत्यादिकांनी निर्मिलेले– असल्यामुळे मानवाच्या स्वाभाविक मर्यादा व दोष धर्मग्रंथांमध्येही शिरलेले असतात. म्हणून गांधींनी ग्रंथांचे काही तात्त्विक निष्कर्ष काढले आहेत. ते काढीत असताना हिंदू धर्मातील विचारांची तात्त्विक पार्श्वभूमी त्यांनी स्पष्टपणे गृहीत धरली आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे पाच नैतिक नियम त्यांच्या विचारसरणीचा पाया आहेत. उपनिषदे व गीता   यांमधील ईश्वरविषयक सिद्धांत या मूलभूत नैतिक नियमांचा आधार त्यांनी मानला आहे.

गांधीवाद हा धार्मिक मानवतावाद आहे. नीतिशास्त्र, समाजरचना व राजनीती यांस आधारभूत अशी नैतिक दृष्टी या मानवतावादामध्ये स्वीकारलेली दिसते. ईश्वरनिष्ठा ही मूलभूत आहे. ईश्वर म्हणजेच सत्य व सत्य म्हणजेच ईश्वर, असे गूढवादी समीकरण गांधींनी मांडले आहे. ईश्वर हेच सत्य, हा उपनिषदांचा व अद्वैत वेदान्ताचा सिद्धांत आहे. सृष्टीचे वैज्ञानिक पद्धतीने शोधलेले सत्य, असा त्या सत्याचा अर्थ नाही उच्च नैतिक नियम असा या सत्याचा अर्थ दिसतो. म्हणून ‘सत्याचा प्रयोग’ या शब्दावलीने सूचित केलेली वैज्ञानिक पद्धती ही आलंकारिक अर्थानेच घ्यावयाची आहे.

या संदर्भात मुद्दा उपस्थित होतो, की सत्यसंशोधनास अंत नसतो. कारण माणसास सत्य पूर्णपणे सापडत नसते सर्वज्ञ कोणी नसतो. म्हणून लोकशाहीत विचारस्वातंत्र्य व प्रचारस्वातंत्र्य हा मूलभूत मानवी हक्क मानला आहे. परंतु विचारांच्या प्रचारस्वातंत्र्याचा हा मूलभूत हक्क सत्यसंशोधनार्थ आवश्यक आहे, हा सिद्धांत गांधीजींनी कोठेही प्रतिपादिलेला आढळत नाही. याचे कारण असे दिसते, की गांधी बुद्धिवादापेक्षा आतल्या आवाजालाच प्राधान्य देत होते.

गांधी म्हणतात, की ईश्वर हा स्वतःसिद्ध, स्वयंप्रकाश व इंद्रियांच्या आणि बुद्धीच्या पलीकडचा असल्यामुळे, बुद्धिवादाच्या कसोट्या त्याला लागू पडत नाहीत. तो अनुभवसिद्ध आहे. हा अनुभव तपश्चर्येने व वैराग्याने ज्यांचे अंतःकरण शुद्ध झाले आहे, त्यांना म्हणजे तुलसीदास, चैतन्य, रामदास, तुकाराम यांच्यासारख्या भक्तांना येतो. ईश्वर हा सर्वांचा अंतरात्मा आहे. जीवात्मा त्याचा अंश आहे. अहंकाराचा त्याग केला, स्वतःला शून्य केले की तोच राहतो. ईश्वर हाच सत्य असल्यामुळे अन्य जग मिथ्या आहे. सर्व प्राण्यांमध्ये एकच प्राण किंवा जीव आहे व तोच ईश्वर होय. विश्व ही त्याची लीला आहे. तो प्रकाश म्हणजे चैतन्य आहे व तोच अनंतानंद आहे.

ईश्वर सत्य आहे म्हणजे काय, तर तो विश्वाच्या उत्पत्तिस्थितिसंहारांची नियामक शक्ती आहे ही नियामक शक्ती ही नैतिक शक्ती आहे. आई, बाप, कन्या, पुत्र, बंधू, मित्र यांच्यातील प्रेम एकमेकांचे संरक्षण करते. कुटुंब, राष्ट्र, मानवजात, जीवसृष्टी व वस्तुमात्र यांना एकत्र करणारी शक्ती म्हणजे प्रेम होय. परमेश्वर प्रेमरूप आहे. आस्तिक व नास्तिक हे सर्व सत्याचे उपासक बनतात, तेव्हा ते ईश्वर उपासकच बनतात. जो नास्तिक ईश्वर नाही, असे म्हणतो, परंतु सत्याचे परिपालन करतो, त्याला सत्याचे आकर्षण असते म्हणून तोसुद्धा एका अर्थी ईश्वराचे अस्तित्व मान्यच करतो. शत्रूवरही प्रेम केले, तर तो मित्र बनल्याशिवाय राहत नाही. कारण शत्रूच्या हृदयात परमेश्वराचा प्रकाश म्हणजे प्रेम आहेच. शत्रू जर मित्र बनला नाही, तर आपल्या तपश्चर्येत काही तरी उणीव आहे असे मानावे. ईश्वराने जगात पापाला अवसर दिला आहे त्यातून भक्तीने उत्तीर्ण होता येते. भक्ती व प्रार्थना खरी असली पाहिजे. भक्ती ही नैतिक शक्तीची भक्ती असते. प्रार्थना उत्कट असल्यास व चित्त शुद्ध असल्यास परमेश्वराचा म्हणजे अंतरात्म्याचा आवाज ऐकू येतो व तो सत्याचा मार्ग दाखवितो. गांधींनी याच दृष्टीने आत्मचरित्राला सत्याचे प्रयोग असे नाव दिले आहे. ईश्वररूप सत्य गवसण्याकरिता फार मोठे प्रयत्‍न करावे लागतात त्याकरिता इंद्रियसंयम करावा लागतो अहिंसेची दीक्षा घ्यावी लागते. कारण अहिंसा हे सत्याचे साधन आहे. संपूर्ण अहिंसा ही सत्याच्याच कलदार नाण्याची दुसरी बाजू आहे. अहिंसा म्हणजे प्रेम होय.

अहिंसा हा आपल्या मानववंशाचा जीवनधर्म आहे. मानवसमाजाचे अस्तित्व अहिंसेवर आधारलेले आहे. शरीर आणि हिंसा यांचा नित्य संबंध आहे हा एक बंध आहे या बंधातून मुक्त होण्याचा मार्ग अहिंसा हा होय. शरीर असेपर्यंत कमीत कमी हिंसा म्हणजे अहिंसा असा अर्थ करावा लागतो. शरीरावर जितकी आसक्ती तितकी हिंसा अधिक. म्हणून शरीरावरची आसक्ती कमी केली पाहिजे. शरीरावरील आसक्ती कमी केल्याने म्हणजे तपश्चर्येने, संयमाने आत्मशक्ती वाढते, प्रकट होते. सर्वच प्राणिवर्ग अहिंस्य आहे. परंतु मानववंश श्रेष्ठ असल्यामुळे इतर प्राण्यांना वाचविण्याकरिता मानवाची हत्या होता कामा नये. मुंग्या, माकडे, कुत्री इ. इतर प्राण्यांना अन्न देणे, हे युक्त नाही असे एके ठिकाणी गांधी म्हणतात. परंतु याच्या उलटही त्यांची अनेक विधाने सापडतात. मांसाहार वर्ज्य करावा, हे हिंदुधर्मातील अहिंसेचे उत्कृष्ट प्रत्यंतर आहे, असे ते म्हणतात. गायीचा जीव वाचविण्याकरिता प्राणार्पण करणे, याचीही ते प्रशंसा करतात. गाय दयेचे काव्य आहे तिची मी पूजा करतो हिंदुधर्मातील गोपूजा, वृक्षपूजा हे अहिंसेचेच प्रत्यंतर आहे असे गांधी म्हणतात.

अहिंसेचा व सत्याचा हा सिद्धांत गांधींनी राजकीय व सामाजिक क्षेत्रांत मोठ्या निष्ठेने आणला. त्याला ते सत्याग्रह असे म्हणतात. शुद्ध साध्याकरिता शुद्ध साधनेच उपयोगी पडतात शुद्ध साध्याकरिता अशुद्ध साधने वापरल्यास साध्यही अशुद्ध बनते साध्य दूर जाते सत्याग्रहच शुद्ध साधन होय. सत्याग्रह म्हणजे सत्याकरिता अहिंसेच्या मार्गाने असत्याचा प्रतिकार करणे. ज्या व्यक्तींच्या ठिकाणी नैतिक दृष्ट्या अयोग्य व गर्ह्य परिस्थितींचा प्रतिकार करण्याची शक्ती असते, म्हणजे आत्मशक्ती प्रकट झालेली असते, तेच सत्याग्रहाचे अधिकारी होत. त्यांची शरीरक्लेश सहन करण्याची शक्ती हा आत्मशक्तीचा एक भाग आहे. कित्येक वेळा शरीरक्लेश सहन करून प्रतिकार करणारा प्रतिपक्षावर जबरदस्तीही करू शकतो. त्याचा आग्रह अविवेकीही असू शकतो. त्याची सत्याची कल्पना चुकीचीही असू शकते. त्यात असत्यही भरलेले असण्याची शक्यता असते. म्हणून खऱ्या सत्याग्रहीला नैतिक दृष्ट्या अयोग्य काय व योग्य काय हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी पतकरावी लागते आणि आपल्या प्रतिकाराच्या उद्देशात असत्य दिसल्यास माघार घेण्याची तयारीही असावी लागते. माघार घेण्याकरितासुद्धा धैर्य लागते. निःशस्त्र प्रतिकारसुद्धा हिंसात्मक म्हणजे जबरदस्ती करणारा असतो. त्यात अत्याचारही असतो. सत्य हे तत्त्वतः शत्रूलाही मान्य असावे लागते. कारण विवेकबुद्धीची देणगी मानवाला प्राप्त झालेली आहे.

मनुष्य ही ईश्वराने घडविलेली स्वतःची प्रतिमा आहे, हे ख्रिस्ती तत्त्व गांधींनी मान्य केले आहे. जीवात्मा हा परमेश्वराचा अंश आहे, याची जाणीव अस्पष्टपणे माणसाला असतेच, असा हिंदुधर्माचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत व ख्रिस्ती सिद्धांत यांच्यामध्ये एक प्रकारची सुसंगती आहे. मानवाची सेवा हीच ईश्वराची पूजा होय, असा निष्कर्ष गांधींनी ख्रिस्ती धर्माच्या चिंतनातून काढला आहे.

युद्ध वा मानवी हिंसेचे अनेक कायदेशीर व बेकायदेशीर प्रकार अहिंसेच्या तत्त्वाप्रमाणे बंद व्हावयास पाहिजेत, हे जरी खरे असले, तरी आजची जागतिक राजकीय परिस्थिती व सत्तेचे राजकारण लक्षात घेता, संरक्षण संस्था वा सैनिकशक्तीची संस्था ही आज तरी अपरिहार्य आहे, असे गांधींनी मान्य केले आहे. परंतु मानव हा बुद्धियुक्त प्राणी असल्यामुळे मानवामानवांमधील हिंसा बंद करणे हे मानवी कर्तव्य आहे, असे ते मानतात. अहिंसा हा ढोंगी दुर्बलाचा सिद्धांत नाही. ढोंगी, भित्रा मनुष्य व शस्त्राने प्रतिकार करणारा शूर मनुष्य यांच्यात सशस्त्र शूर, गांधींनी पसंत केला आहे. सबलाची अहिंसा हीच खरी अहिंसा होय, असे त्यांनी वारंवार प्रतिपादिले आहे.

गांधींचा ब्रह्मचर्याचा सिद्धांत, हा अहिंसेचाच उपसिद्धांत आहे. इंद्रियांवर, संभोगावर विजय मिळविल्याशिवाय निःस्वार्थता प्राप्त होत नाही. निःस्वार्थता असेल, तरच अहिंसा साधते. स्त्री-पुरुषांचे मैथुन हे तत्त्वतः वर्ज्यच असले पाहिजे. प्रजोत्पादनाकरिता मैथुन आवश्यक आहे परंतु तेही टाळणे शक्य असल्यास ते टाळावे. पुष्कळ वेळा पुरुषाने केलेला संभोग ही स्त्रीवर केलेली जबरदस्ती असते, अशी गांधींची समजूत आहे. याविरुद्धही गांधींजी एके ठिकाणी लिहितात, की स्त्री-पुरुषांचे लैंगिक आकर्षण हे महनीय आहे. संतती सृष्टीमध्ये सतत आवश्यक आहे कारण परमेश्वराच्या लीलेचा तो भाग आहे. सृष्टी ही परमेश्वराची लीला आहे परंतु स्त्री-पुरुष संभोग ह्या अपवित्र क्रिया आहेत, अशाच प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन आहे. त्यांची अशी समजूत दिसते, की स्त्री-पुरुष संभोगात मानवी सामर्थ्याचा अपव्यय होतो मग तो संभोग विवाहित स्त्री-पुरुषांचा असो अथवा अविवाहितांचा असो. वैवाहिक संभोग ही पापावर घातलेली मर्यादा आहे. तेही पापच आहे. कारण त्याच्या योगाने मनुष्याचा शक्तिपात होतो. हा योगशास्त्रातील ब्रह्मचर्यविषयक सिद्धांत आहे परंतु तो जीवविज्ञानाच्या दृष्टीने चुकीचा सिद्धांत आहे. कारण संभोगात होणारा वीर्यपात हा मर्यादित प्रमाणात होत असला, तर त्यामुळे शारीरिक किंवा मानसिक सामर्थ्य घटत नाही, उलट वाढते. गांधींचा याबद्दलचा दृष्टिकोन मानवी जीवविज्ञानदृष्ट्या नीट तपासला गेला नाही. एवढे मात्र खरे, की वैवाहिक संबंधातून कुटुंबसंस्था निर्माण होते, त्यामुळे आप्तसंबंध तयार होतो व मर्यादित प्रेम उत्कट होते. सर्व मानवच आप्त आहेत, असा गांधींचा दृष्टिकोन आहे. नैसर्गिक आप्तसंबंधाने मर्यादित न होणारे प्रेम हे संन्यासाशिवाय कोणालाच शक्य नाही, म्हणून गांधी-सिद्धांत हा संन्याससिद्धांताचाच एक उपसिद्धांत आहे, असे मानावे लागते. ब्रह्मचर्य हे ईश्वरप्राप्त्यर्थ आवश्यक आहे हाही गांधींचा विचार ह्या संन्यासमार्गाचाच भाग आहे.

सत्य व अहिंसा या दोन नैतिक तत्त्वांवर आधारलेला रस्किनच्या पुस्तकावरून सुचलेला गांधींचा सर्वोदयवाद हे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक तत्त्वज्ञान आहे. समाजाचा आध्यात्मिक विकासवाद गांधींनी मांडला आहे. म्हणजे व्यक्तीप्रमाणे समाजाचीही समाजिक व राजकीय प्रगती होत असते, असे सर्वोदयवादात गृहीत धरले आहे.

आर्थिक समता मानवी ऐक्याच्या तत्त्वावर विकसित करणे, ही ऐतिहासिक प्रगतीची गरज आहे. सत्याग्रह हे त्याचे साधन आहे. दलित व पीडित वर्गाला समतेचा न्याय पहिल्यांदा मिळाला पाहिजे, याकरिता दलित व पीडित यांची सेवा केली पाहिजे व अन्यायाचा सत्याग्रहाच्या द्वारे प्रतिकार हा सतत चालला पाहिजे. विकास व क्रांतीचे प्रयत्‍न निसर्गाप्रमाणे समाजातही चालणार. भूकंप, वादळी उलथापालथ ही निसर्गात चालते, तशी समाजातही चालणारच. प्रगतीला तिची कित्येक वेळा आवश्यकता असते. परंतु शांततापूर्ण मार्गाने सामाजिक विकास घडवून आणणे यावरच गांधींचा मुख्यतः भर आहे.

गांधी हे मूळचे वर्णाश्रमसंस्थेचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी जातिभेदाचेही समर्थन संयमाच्या तत्त्वानुसार केले आहे. स्वजातीमध्येच लग्‍न करणे व स्वजातीचेच अन्नग्रहण करणे, यांत लैंगिक व रसनेचा संयम हे तत्त्व आहे, असे त्यांनी प्रतिपादिले आहे. परंतु १९३६-३७ च्या सुमारास गांधींनी वर्णाश्रमाचे आपले भाष्य बंद केले साम्यवाद व समाजवाद यांचा नवीन पिढीमध्ये प्रसार होत आहे, हे पाहून त्यांनी अध्यात्मवादावर आधारलेल्या आर्थिक व सामाजिक समतावादाचा पुरस्कार सुरू केला. सामाजिक उच्चनीचभाव व हिंदूंची अस्पृश्यतेची संस्था हे सर्वोदयवादाशी विरुद्ध आहेत, म्हणून उच्चनीचभाव व अस्पृश्यता नष्ट करणे, ही गोष्ट सामाजिक प्रगतीची गरज आहे असा विचार गांधींनी मांडला आहे.

गांधींचे अर्थकारण : विशिष्ट नैतिक ध्येयवादास अनुसरून आर्थिक व्यवहार कसे चालावेत, यासंबंधी भारताच्या व जगाच्या आर्थिक व्यवस्थेबद्दलचे गांधींचे धोरण हे त्यांचे अर्थकारण. अर्थशास्त्र आर्थिक व्यवहारांचे नियम सांगणारे शास्त्र होय. तसे अर्थशास्त्र गांधींनी किंवा गांधींवाद्यांनी सांगितलेले नाही. कार्ल मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादानुसारे मानवी आर्थिक व्यवहारांचे ऐतिहासिक नियम आहेत. त्याप्रमाणे अपरिहार्य ऐतिहासिक परिणतीने साम्यवादाकडे जाणारे समाजवादी अर्थशास्त्र निष्पन्न होते. गांधी असा ऐतिहासिक परिणतिक्रम गृहीत धरून आपले अर्थशास्त्र सांगत नाहीत.

गांधींच्या आर्थिक धोरणाची मूलभूत तीन सूत्रे आहेत: (१) न संपणाऱ्या नैसर्गिक संपत्तीवर अधिक भर असलेली अर्थव्यवस्था चिरंतन असू शकते अशी अर्थव्यवस्था अंमलात आणली पाहिजे. निसर्गसंपत्तीचे दोन वर्ग एक संपणारा म्हणजे सर्व खनिजे उदा., दगडी कोळसा, लोखंडादी धातू, खनिज तेले इत्यादी व दुसरा न संपणारा म्हणजे माती, दगड, लाकूड, वनस्पती, धान्ये, फळे, फुले, पाणी, प्रकाश, उष्णता, वायू, प्राणी, जनावरे इत्यादी. (२) शरीरश्रमाचे महत्त्व असलेली अर्थव्यवस्था कार्यवाहीत आली पाहिजे. कर्मेद्रियांनी, विशेषतः हातापायांनी, कामे करण्यानेच मानव चांगला सशक्त, शरीराने आणि मानाने निरोगी व दीर्घायुषी राहू शकतो. (३) ज्या अर्थव्यवस्थेत श्रीमंत व गरीब हा भेद जाचक स्वरूपात राहील, अशी अर्थव्यवस्था असता कामा नये. तत्त्वतः संपत्तीवर खाजगी मालकी कोणाचीच नसावी. शरीरश्रम करील, त्यालाच संपत्तीचा उपभोग घेण्याचा नैतिक दृष्ट्या हक्क आहे. श्रीमंत व गरीब या दोघांनाही असा हक्क आहे. परंतु आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याची बुद्धिमत्ता व कुशलता ज्या व्यक्तींच्या ठिकाणी वास करते, त्यांना औद्योगिक नेतृत्व लाभू शकते त्यांना यासंबंधात संपूर्ण स्वातंत्र्य व अवसर मिळाला पाहिजे. हा औद्योगिक नेता मात्र मोठ्या संपत्तीचा मालक न राहता, तो समाजातर्फे त्या संपत्तीचा विश्वस्त बनलापाहिजे. विश्वस्त म्हणून राहण्यास व स्वतःचा मालकी हक्क सोडण्यास तो नाराज असल्यास, कायद्याने व लोकशाही पद्धतीने मालकवर्गांचा मालकी हक्क रद्द केला पाहिजे.

एकोणिसाव्या शतकातील यूरोपीय किंवा पश्चिमी क्रांतीत उत्पन्न झालेल्या सामाजिक अनिष्टांची प्रतिक्रिया म्हणून गांधींनी आपले निराळे आर्थिक धोरण, ती अनिष्टे टाळण्याकरिता प्रतिपादिले. औद्योगिक क्रांतीने शहरांची राक्षसी वाढ झाली, ग्रामीण जीवन विस्कळित झाले, रेल्वे वगैरे वेगवान साधनांनी रोगांचा फैलाव होऊ लागला, हस्तव्यवसाय बुडले, बेकारांची संख्या अनावरपणे वाढू लागली व भांडवलदारवर्ग मजुरांची पिळवणूक अधिकाअधिक करू लागला, त्यामुळे श्रीमंत व गरीब हा भेद अत्यंत तीव्र झाला. हस्तव्यवसाय सुटल्यामुळे माणसांचे आरोग्य बिघडू लागले. माणसांना आधिभौतिक भोग हेच मुख्य श्रेय वाटू लागले व समाधानी वृत्ती नष्ट होऊन माणूस यंत्रांचा दास झाला. औद्योगिक क्रांती झालेली राष्ट्रे मागासलेल्या राष्ट्रांवर साम्राज्य पसरवू लागली आणि मागासलेल्या राष्ट्रांची आर्थिक व सांस्कृतिक दुरवस्था वाढली, याची तीव्र जाणीव होऊन गांधींनी नवे आर्थिक धोरण सांगितले.

निसर्गातील जी संपत्ती माणसाला निरंतर प्रयत्‍न करून चिरंतन कालपर्यंत लाभेल, तिच्याच आधारावर उद्योग चालविले पाहिजेत. खनिज संपत्तीवर आधारलेले आधुनिक यांत्रिक उद्योग हे दुय्यम म्हणून अपरिहार्य असतील, तेवढे चालविणे हितावह होईल. परंतु मनुष्याच्या शरीरश्रमाची गरज संपली आहे, अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. ग्रामसंस्था कायम टिकेल व शहरे वाढणार नाहीत अशी अर्थव्यवस्था पाहिजे ती कुटिरोद्योगांवरच टिकू शकेल. औद्योगिक क्रांतीमुळे शहरांची भरमसाट वाढ होत आहे, ती थांबली पाहिजे. आधुनिक वैज्ञानिक शोधांवर आधारलेली आर्थिक क्रांती ही जगातील संपन्न राष्ट्रांची युद्धखोरी वाढवीत आहे. जगातील राष्ट्राराष्ट्रांमध्ये शांततेचे संबंध निर्माण करण्यास हा परिस्थिती प्रतिकूल आहे.

आजचे स्वतंत्र भारताचे अर्थकारण हे या गांधीवादी अर्थकारणातून दूर गेले आहे. ते ग्रामराज्य स्थापण्यास अनुकूल नाही. पश्चिमी समाजवादी व समाजवादी नसलेली राष्ट्रे ज्या प्रकारची अर्थव्यवस्था वाढवीत आहेत व दृढ करीत आहेत, त्याच प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा पाया स्वतंत्र भारतातही निर्माण होत आहे. (चित्रपत्र ४५).

पहा: भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास.

संदर्भ:   1. Adi, H. A. Probe into the Gandhian Concept of Ahimsa , Calcutta, 1962.

           2. Alexander, Horace, Gandhi Through Western Eyes , Bombay, 1969.

           3. Anand, Mulk Raj, Humanism of M. K. Gandhi, Varanasi, 1971.

           4. Behari, Bepin, Gandhian Economic Philosophy , Bombay, 1963.

           5. Biswas, S. C. Ed. Gandhi: Theory and Practice–Social Impact and Contemporary

            Relevance, Simla, 1969.

           6. Cousins, Norman, Ed. Profiles of Gandhi, Delhi, 1969.

           7. Gandhi, M. K. My Experiments With Truth, Bombay, 1936.

           8. Karaka, D. F. Out of Dust , Bombay, 1939.

          9. Keer, Dhananjay, Mahatma Gandhi, Bombay, 1973.

         10. Kripalani, J.B. Gandhian Thought, Bombay, 1961.

        11. Kripalani, J.B. Gandhi: His Life and Thought, Delhi, 1972.

        12. Tendulkar, D. G. Mahatma, 8 Vols., New Delhi, 1960—63.

आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..

You might also like, हेरास, फादर हेन्री, अधिराज्यत्व, कान्हेरे, अनंत लक्ष्मण.

Speeches and Writings of M. K. Gandhi

SPEECHES AND WRITINGS

M. K. GANDHI

an introduction by

MR. C. F. ANDREWS

and a biographical sketch

THIRD EDITION

G. A. NATESAN & CO., MADRAS

RUPEES THREE

religious prophets as Confucius and Lao-tse, Buddha, Zoroaster and Mohammed, and, most truly of all, the Nazarene ! Out of Asia, at long intervals of time, have arisen these inspired witnesses of God. One "by one they have appeared to teach men by precept and example the law of life, and thereivith to save the race. To-day, in this our time, there comes another of this sacred line, the Mahatma of India. In all reverence and with due regard for historic fact, I match this man with Jesus Christ: — Rev. Dr. Holmes.

PUBLISHERS' NOTE

This is an exhaustive, comprehensive and thoroughly up-to-date edition of Mr. Gandhi's Speeches and Writings revised and considerably amplified, with the addition of a large number of articles from Young India' and Navajivan (rendered int English.) The-inclusion of these papers have almost doubled the size of the old edition and the present collection runs to about 1,000 pages of well-arranged matter ranging over the whole period of Mr. Gandhi's public life. It opens with a succinct biographical sketch of Mr. Gandhi bringing the account of his life down to the historic trial and sentence. The Volume begins with the Indian South African Question and covers his views on indentured labour and Indians in the Colonies, his jail experiences in South Africa, his pronouncements on the Khaira and Champaran affairs, his discourses on Rowlatt Bills and Satyagraha, and finally his Young India and Navajivan articles on the Non-Cooperation movement, including select papers on the Khilafat and Punjab wrongs, the Congress, Swadeshi, Boycott, Charka , National Education and Swaraj. The additional chapters are arranged under suitable headings and include his messages on the eve of and after the arrest, his statement before the court, the trial and judgment. ​ Then follows a symposium of appreciations from such diverse men as Tolstoy and Tagore, Prof. Gilbert Murray and Dr. Holmes of New York besides excerpts from the British and American press. The book which is bound in cloth and indexed contains portraits of Mr. and Mrs. Gandhi and three characteristic pictures of Mr. Gandhi taken at different periods of his life.

May , 1922 .

G. A. NATESAN & CO. ​

Introduction (p. 21 )

M. K. Gandhi: A Sketch (p. 27 )

South African Indian Question

Jail Experiences

Passive Resistance

The Champaran Enquiry

The Kaira Question

Earlier Indian Speeches

The Rowlatt Bills & Satyagraba

Non-Co-Operation

On the Eve of Arrest

After the Arrest

The Great Trial

Jail Life in India

Miscellaneous

Appendix II — Appreciations.

Related Books (p. 986 )

Index (p. 987 )

Related Books and Eminent Orientalists (p. 995 )

Illustrations

This work is in the public domain in the United States because it was published before January 1, 1929.

The longest-living author of this work died in 1948, so this work is in the public domain in countries and areas where the copyright term is the author's life plus 75 years or less . This work may be in the public domain in countries and areas with longer native copyright terms that apply the rule of the shorter term to foreign works .

Public domain Public domain false false

mahatma gandhi speech in marathi 2nd standard

  • PD-old-75-US
  • Incomplete texts

Navigation menu

  • Skip to main content
  • Screen Reader Access
  • Hindi (hi) English (UK)
  • Download Ashram Guide
  • Activities at Ashram
  • Ashram Institutions
  • Ashram Observances
  • Life Chronology
  • Family Tree
  • Reflections

Dandi March

  • Great Trial (1922)
  • Gandhi and Kasturba
  • Ashram Sites
  • Ashram Virtual Tour
  • Gandhi in Ahmedabad Gallery
  • My Life is My Message Gallery
  • Painting Gallery
  • Archives & Library
  • Photo Gallery
  • Video Gallery
  • Audio Gallery
  • Sabarmati Lecture
  • Sabarmati Dialogue
  • Gandhi Samvad
  • 3D Models of the Artifacts
  • Museum Shop
  • You are here:  

mahatma gandhi speech in marathi 2nd standard

The Mahatma

Ashram Tour

On The Eve Of Historic Dandi March (11-3-1930)

Dandi March

[On the 11th of March 1930, the crowd swelled to 10,000 at the evening prayer held on the Sabarmati sands at Ahmedabad. At the end, Gandhiji delivered a memorable speech on the eve of his historic march:]

In all probability this will be my last speech to you. Even if the Government allow me to march tomorrow morning, this will be my last speech on the sacred banks of the Sabarmati. Possibly these may be the last words of my life here.

I have already told you yesterday what I had to say. Today I shall confine myself to what you should do after my companions and I are arrested. The programme of the march to Jalalpur must be fulfilled as originally settled. The enlistment of the volunteers for this purpose should be confined to Gujarat only. From what I have been and heard during the last fortnight, I am inclined to believe that the stream of civil resisters will flow unbroken.

But let there be not a semblance of breach of peace even after all of us have been arrested. We have resolved to utilize all our resources in the pursuit of an exclusively nonviolent struggle. Let no one commit a wrong in anger. This is my hope and prayer. I wish these words of mine reached every nook and corner of the land. My task shall be done if I perish and so do my comrades. It will then be for the Working Committee of the Congress to show you the way and it will be up to you to follow its lead. So long as I have reached Jalalpur, let nothing be done in contravention to the authority vested in me by the Congress. But once I am arrested, the whole responsibility shifts to the Congress. No one who believes in non-violence, as a creed, need, therefore, sit still. My compact with the Congress ends as soon as I am arrested. In that case volunteers. Wherever possible, civil disobedience of salt should be started. These laws can be violated in three ways. It is an offence to manufacture salt wherever there are facilities for doing so. The possession and sale of contraband salt, which includes natural salt or salt earth, is also an offence. The purchasers of such salt will be equally guilty. To carry away the natural salt deposits on the seashore is likewise violation of law. So is the hawking of such salt. In short, you may choose any one or all of these devices to break the salt monopoly.

We are, however, not to be content with this alone. There is no ban by the Congress and wherever the local workers have self-confidence other suitable measures may be adopted. I stress only one condition, namely, let our pledge of truth and nonviolence as the only means for the attainment of Swaraj be faithfully kept. For the rest, every one has a free hand. But, than does not give a license to all and sundry to carry on their own responsibility. Wherever there are local leaders, their orders should be obeyed by the people. Where there are no leaders and only a handful of men have faith in the programme, they may do what they can, if they have enough self-confidence. They have a right, nay it is their duty, to do so. The history of the is full of instances of men who rose to leadership, by sheer force of self-confidence, bravery and tenacity. We too, if we sincerely aspire to Swaraj and are impatient to attain it, should have similar self-confidence. Our ranks will swell and our hearts strengthen, as the number of our arrests by the Government increases.

Much can be done in many other ways besides these. The Liquor and foreign cloth shops can be picketed. We can refuse to pay taxes if we have the requisite strength. The lawyers can give up practice. The public can boycott the law courts by refraining from litigation. Government servants can resign their posts. In the midst of the despair reigning all round people quake with fear of losing employment. Such men are unfit for Swaraj. But why this despair? The number of Government servants in the country does not exceed a few hundred thousands. What about the rest? Where are they to go? Even free India will not be able to accommodate a greater number of public servants. A Collector then will not need the number of servants, he has got today. He will be his own servant. Our starving millions can by no means afford this enormous expenditure. If, therefore, we are sensible enough, let us bid good-bye to Government employment, no matter if it is the post of a judge or a peon. Let all who are co-operating with the Government in one way or another, be it by paying taxes, keeping titles, or sending children to official schools, etc. withdraw their co-operation in all or as many watts as possible. Then there are women who can stand shoulder to shoulder with men in this struggle.

You may take it as my will. It was the message that I desired to impart to you before starting on the march or for the jail. I wish that there should be no suspension or abandonment of the war that commences tomorrow morning or earlier, if I am arrested before that time. I shall eagerly await the news that ten batches are ready as soon as my batch is arrested. I believe there are men in India to complete the work our begun by me. I have faith in the righteousness of our cause and the purity of our weapons. And where the means are clean, there God is undoubtedly present with His blessings. And where these three combine, there defeat is an impossibility. A Satyagrahi, whether free or incarcerated, is ever victorious. He is vanquished only, when he forsakes truth and nonviolence and turns a deaf ear to the inner voice. If, therefore, there is such a thing as defeat for even a Satyagrahi, he alone is the cause of it. God bless you all and keep off all obstacles from the path in the struggle that begins tomorrow.

Mahatma, Vol. III (1952), pp. 28-30 Source: Selected works of Mahatma Gandhi Volume-Six

About Gandhi Ashram

  • Speeches(Text)

Visitor Info

Subscribe to newsletter.

  • FC(R)A Documents
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
  • Copyright Policy
  • Hyperlinking Policy
  • Accessibility Statement
  • Recent Updates
  • Request For Proposal
  • Privacy Policy for Mobile Apps

Copyright © 2005 - 2019 Sabarmati Ashram Preservation and Memorial Trust.

Beta Version

IMAGES

  1. mahatma gandhi information in marathi speech Archives

    mahatma gandhi speech in marathi 2nd standard

  2. Mahatma Gandhi Speech in Marathi

    mahatma gandhi speech in marathi 2nd standard

  3. महात्मा गांधी जयंती भाषण, Mahatma Gandhi Speech in Marathi

    mahatma gandhi speech in marathi 2nd standard

  4. Short speech on Mahatma Gandhi in Marathi

    mahatma gandhi speech in marathi 2nd standard

  5. महात्मा गांधी मराठी भाषण 2018

    mahatma gandhi speech in marathi 2nd standard

  6. Mahatma Gandhi Speech In Marathi

    mahatma gandhi speech in marathi 2nd standard

VIDEO

  1. गांधी जयंती खूप सोपे आणि सुंदर भाषण मराठी / Mahatma Gandhi Speech in Marathi/ Gandhi Jayanti Bhashan

  2. महात्मा गांधी भाषण / निबंध

  3. महात्मा गांधी मराठी भाषण 2023| Mahatma Gandhi Marathi Bhashan

  4. Mahatma Gandhi Speech in English

  5. महात्मा गांधी जयंती भाषण मराठी / Mahatma Gandhi Bhashan Marathi / Mahatma Gandhi Speech in Marathi

  6. Mahatma Gandhi Speech in 10 lines in Telugu|10 Lines about Mahatma Gandhi in Telugu

COMMENTS

  1. महात्मा गांधी भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi

    मित्रानो तुमच्याकडे जर "महात्मा गांधी भाषण मराठी" speech on mahatma gandhi in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ...

  2. महात्मा गांधी जयंती भाषण मराठी

    महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi | Mahatma Gandhi jayanti bhashan ...

  3. Mahatma Gandhi Jayanti Marathi Bhashan

    This video is very useful to all to write Marathi Essay or speech on Mahatma Gandhi Jayanti 2 nd October. Mahatma Gandhi Jayanti is celebrated as non voilanc...

  4. महात्मा गांधी जयंती भाषण 10 ओळी 2023

    महात्मा गांधीजी जयंती निमित्त 10 सोप्या ओळी 2023 | 10 lines speech on mahatma Gandhi jayanti in Marathi 2023. महात्मा गांधी जयंती भाषण 2 October Mahatma Gandhi speech in Marathi: 2 ऑक्टोंबर म्हणजेच ...

  5. (2023) महात्मा गांधी जयंती भाषण मराठी

    महात्मा गांधी भाषण मराठी Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi : तर मंडळी वरील लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 2 महात्मा गांधी जयंती भाषण शेअर केलेत. आशा आहे ...

  6. महात्मा गांधी " वर मराठी भाषण Mahatma Gandhi Speech In Marathi

    म्हणून आज मला इथे भाषण देण्यासाठी सर्वात मोठी संधी मिळाली याबद्दल मी गुरुजनांचे आभार मानतो आणि भाषणाला सुरुवात करतो. " गांधी जयंती ...

  7. महात्मा गांधी भाषण मराठी

    महात्मा गांधी जयंती भाषण | Mahatma Gandhi Bhashan in MarathiTopics covered in this video:- 1. mahatma gandhi speech in marathi2. mahatma gandhi speech in ...

  8. Mahatma Gandhi Speech In Marathi

    आम्ही दिलेल्या माहितीचा उपयोग , Mahatma Gandhi Speech In Marathi, Mahatma Gandhi Bhashan Marathi, Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi, Mahatma Gandhi Speech Marathi या भाषणसाठी उपयोग करू शकता. वरील भाषण एकदम ...

  9. Gandhi Jayanti: गांधी जयंती विषयावर दमदार भाषण, ऐकून सगळेच वाजवतील

    Gandhi Jayanti Speech In Marathi: २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांची १५४वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.,देश-विदेश बातम्या ... Mahatma Gandhi. Gandhi Jayanti 2023: देशात ...

  10. महात्मा गांधी मराठी भाषण

    Mahatma Gandhi Speech in Marathi. gandhi jayanti speech in marathi सम्पुर्ण महात्मा गांधी मराठी भाषण ६वी ७ वि १० वी व १२ वि करीत मराठी मध्ये.

  11. Mahatma Gandhi Jayanti 2023 Speech In Marathi; यावर्षी गांधी जयंतीच्या

    Gandhi Jayanti Speech In Marathi: दरवर्षी २ ऑक्टोबरला देशभरात गांधी जयंती साजरी ...

  12. Mahatma Gandhi: यंदा महात्मा गांधी जयंतीनिमित्त लहान मुलांना लिहून द्या

    Mahatma Gandhi speech in Marathi: महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधींची जयंती साजरी केली ...

  13. Mahatma Gandhi Jayanti 2023 Speech In Marathi : महात्मा गांधी जयंतीला

    Mahatma Gandhi Jayanti 2023: या वर्षी महात्मा गांधी यांची 154वी जयंती आहे. या निमित्ताने तुम्हाला भाषण करायचे असेल तर तुम्ही काही चांगले विषय निवडू शकता., देश News, Times Now Marathi

  14. गांधी, महात्मा

    गांधी, महात्मा : (२ ऑक्टोबर १८६९-३० जानेवारी १९४८). मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला ...

  15. महात्मा गांधी जयंती भाषण, Mahatma Gandhi Speech in Marathi

    महात्मा गांधी जयंती मराठी भाषण, Mahatma Gandhi Speech in Marathi. नमस्कार मित्रानो आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे, इथे उपस्थित असलेले आदरणीय ...

  16. Mahatma Gandhi Speech in Marathi Know important points on Gandhi

    Gandhi Jayanti 2023 : 'महात्मा गांधी' या विषयावर 5 मिनिटांत तयार करा भाषण, अव्वल नंबर तुमचाच . ... Mahatma Gandhi Speech in Marathi Important points on Gandhi Jayanti 2023 गांधी जयंती 2023 महात्मा ...

  17. Speeches and Writings of M. K. Gandhi

    This is an exhaustive, comprehensive and thoroughly up-to-date edition of Mr. Gandhi's Speeches and Writings revised and considerably amplified, with the addition of a large number of articles from Young India' and Navajivan (rendered int English.) The-inclusion of these papers have almost doubled the size of the old edition and the present collection runs to about 1,000 pages of well-arranged ...

  18. Mahatma Gandhi

    This video has Mahatma Gandhi Speech in Marathi. Information about Mahatma Gandhi in Marathi is present. Speech on gandhi jayanti in marathi language can be ...

  19. PDF Mahatma Gandhi

    Mahatma Gandhi

  20. Speech Of Mahatma Gandhi On The Eve Of Dandi March (Salt Satyagraha)

    It was one of the many residences (1917-30) of Mahatma Gandhi, located at Ahmedabad, Gujarat, India. Check out famous speech of Mahatma Gandhiji on the eve of historic Dandi March. On the 11th of March 1930, the crowd swelled to 10,000 at the evening prayer held on the Sabarmati sands at Ahmedabad. At the end, Gandhiji delivered a memorable speech.

  21. Speech Of Mahatma Gandhi In Marathi

    4629Orders prepared. 77. Customer Reviews. Info Pages. Speech Of Mahatma Gandhi In Marathi, Wifi Kiosks Business Plan, Write An Essay On Water Purification In Hindi, A Research Thesis, Thesis For Descriptive Essay, Second Marriage Wedding Speech Samples, Wonder Of Science Essay 5th Class. 7Customer reviews. 4.7 stars - 1688 reviews.

  22. महात्मा गांधी भाषण मराठी

    #mahatmagandhibhashan#mahatmagandhibhashanmarathi#mahatmagandhi#marathibhashan #mahatmagandhinibandh ##mahatmagandhinibandhmarathi#mahatmagandhispeech#gandhi...

  23. Speech Of Mahatma Gandhi In Marathi

    Speech Of Mahatma Gandhi In Marathi, Order Marketing Biography, Pattern Worksheets For 2nd Grade, Prepositions For 2nd Graders, Cover Letter Rubric For Students, Essay Fx, Health Educator Cover Letter. Level: College, High School, University, Master's, PHD, Undergraduate. Speech Of Mahatma Gandhi In Marathi -.